हदगांव, शेख चांदपाशा| हदगाव नगरपरिषदेस राज्य सरकार कडून अत्याधुनिक फायर बुलेट बाईक प्रदान करण्यात आली आहे. ही बाईक विशेषतः अग्निशमन विभागासाठी तयार करण्यात आली असून, आपत्कालीन परिस्थितींमध्ये तात्काळ कारवाईसाठी उपयुक्त आहे.


नगरपरिषद मुख्याधिकारी गौरव वंडेकर यांनी सांगितले की, ही बाईक आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. आगीवर त्वरीत नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरेल. या फायर बुलेट बाईकमध्ये फायर मिस्ट सिस्टम, दोन छोटे फायर एक्स्टिंग्विशर, सायरन आणि पीए सिस्टम अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. फायर मिस्ट सिस्टम आगीच्या ज्वाळांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष प्रकारच्या मिस्टचा उपयोग करतो. याशिवाय, सायरनची तीव्र आवाज लोकांना सतर्क करत सुरक्षित स्थळी जाण्यास प्रोत्साहित करतो.


तात्काळ कारवाईस मदत
यापूर्वी नगरपरिषदेस 4,000 लिटर क्षमतेचे अग्निशमन वाहन प्रदान करण्यात आले होते. परंतु लहान आगीच्या घटनांवर त्वरीत नियंत्रण मिळवण्यासाठी या बाईकची गरज भासत होती. नवीन फायर बुलेट बाईक 35 लिटर पाण्याच्या क्षमतेसह येते आणि ती अरुंद गल्लींमध्येही सहज पोहोचू शकते.


अग्निशमनात केवळ एकच कर्मचारी
गरिकांचे मत आहे की फायर ब्रिगेडच्या संचालनासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता चिंताजनक आहे. सध्या फक्त एकच कर्मचारी अग्निशमन वाहनावर नियुक्त आहे, जो आपत्कालीन परिस्थितीत अप्रशिक्षित कर्मचाऱ्यां सोबत काम करण्यास मजबूर होतो.
मुख्याधिकारीं यांना विश्वास
मुख्याधिकारी गौरव वंडेकर यांनी विश्वास व्यक्त केला की या फायर बुलेट बाईकमुळे हदगाव नगरातील नागरिकांना आगीच्या घटनां पासून चांगली सुरक्षा मिळेल आणि आपत्कालीन सेवा अधिक प्रभावीपणे चालवल्या जातील असा विश्वास न . पा . मुख्याधिकारी यांनी व्यक्त केला.



