got a modern fire bullet bike : हदगाव नगरपरिषदेस आधुनिक फायर बुलेट बाईक मिळाली
हदगांव, शेख चांदपाशा| हदगाव नगरपरिषदेस राज्य सरकार कडून अत्याधुनिक फायर बुलेट बाईक प्रदान करण्यात आली आहे. ही बाईक विशेषतः अग्निशमन विभागासाठी तयार करण्यात आली असून, आपत्कालीन परिस्थितींमध्ये तात्काळ कारवाईसाठी उपयुक्त आहे.
नगरपरिषद मुख्याधिकारी गौरव वंडेकर यांनी सांगितले की, ही बाईक आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. आगीवर त्वरीत नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरेल. या फायर बुलेट बाईकमध्ये फायर मिस्ट सिस्टम, दोन छोटे फायर एक्स्टिंग्विशर, सायरन आणि पीए सिस्टम अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. फायर मिस्ट सिस्टम आगीच्या ज्वाळांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष प्रकारच्या मिस्टचा उपयोग करतो. याशिवाय, सायरनची तीव्र आवाज लोकांना सतर्क करत सुरक्षित स्थळी जाण्यास प्रोत्साहित करतो.
तात्काळ कारवाईस मदत
यापूर्वी नगरपरिषदेस 4,000 लिटर क्षमतेचे अग्निशमन वाहन प्रदान करण्यात आले होते. परंतु लहान आगीच्या ...
