हिमायतनगर। येथील गुरुकुल इंग्लीश स्कुल व ज्यु. कॉलेजला सर्वोत्कृष्ठ शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, शाळेचे सचिव मनोहर ए राठोड यांना नुकतेच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


ठाणे येथील डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हिरानंदानी मेडयुज येथे महाराष्ट्र इंग्लीश स्कुल ट्रस्टीज असोसिएसन मार्फत शैक्षणीक वर्ष 2024-25 करीता गुरुकुल इंग्लीश स्कुल अँड ज्यु. कॉलेजला सर्वोत्कृष्ठ शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हि शाळा ग्रामीण भागात येत असली तरीही उज्वल भविष्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवून विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करत असते.



यासाठी गुरुकुल इंग्लीश स्कुल ऐंड ज्यु. कॉलेजला हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे मान्यवरांनी ठाणे (मुंबई) येथे नमुद केले आहे, या यशाबदल संस्थेचे अध्याक्ष व सचिन डॉ मनोहर ए. राठोड, सोहम राठोड, श्री विजय गणपत जाधव (मुख्याद्यापक) श्री आडेल भाटे, श्री पंगनवाड सर, श्री गजानन जाधव सर, श्री कृष्णा पवार सर व इतर सर्व शिक्षकाचे अभिनंदन केले जाते आहे.




