नांदेड l माता रत्नेशवरी सेवाभावी शिक्षण संस्था झरी ता. लोहा जि. नांदेड येथील स्वच्छता निरीक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची आज दि.15 फेब्रुवारी रोजी आरोग्य कार्यशाळा शिबीर नेरली( कुष्ठधाम ) येथे आयोजित करण्यात आली होती. संस्थेच्या अध्यक्षा व स्वच्छता दूत श्रीमती सुमनबाई माधवराव पाटील झरीकर यांच्या प्रेरणादायी विचाराने सचिव प्रा. डॉ . सचिन पाटील झरीकर यांच्या मार्गदर्शनानुसार, प्राचार्य प्रा. डॉ. दिग्विजय देशमुख सर, समन्वयक प्रा. संतोष ठाकूर सर यांच्या नियोजनानुसार सदरील शिबीराचे आयोजन केले होते.


सर्व मान्यवर यांच्या येथोचित सत्कार करण्यात आला. सदरील आरोग्य शिबीरात राष्ट्रीय किटकजन्य रोग कार्यक्रम बाबत डॉ राजेश्वर माचेवार साहेब ( जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड ) यांच्या सुचनेनुसार जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक सत्यजीत टिप्रेसवार, व्यकटेश पुलकंठवार यांनी हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू व इतर किटकजन्य आजार बाबत सविस्तर माहिती दिली, प्रात्यक्षिक दाखविले व डास निर्मूलनाची प्रतिज्ञा दिली.

कुष्ठरोग बाबत संतोष टाकळकर ( जिल्हा वैद्यकीय पर्यवेक्षक ) , प्रशांत उमाटे यांनी माहिती दिली तसेच कुष्ठरोग निर्मूलनची प्रतिज्ञा देण्यात आली. नेरली येथे काही महिण्यापुर्वी साथरोग उद्रेक उद्भवला होता येथील आरोग्य कर्मचारी महेश सातारे यांनी वरिष्ठाच्या सुचनेनुसार योग्य प्रकारे नियोजन करून काम उत्कृष्ट केल्या बदल त्यांच्या सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन प्रा. कमलकिशोर कदम, अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. दिग्विजय देशमुख यांनी केले.
यावेळी किरण कुलकर्णी आरोग्य कर्मचारी, कैलास कुंटुरवार विद्यार्थी मल्हार मोरे, ओम उडतेवार, विठ्ठल गवळी, छायाचित्रकार ओम नवघरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य प्रभाकर ढोळे, लोखंडे आणि प्रा लक्ष्मण बोडके यांनी केले तर नेरली कुष्टधाम समन्वयक श्री पवार सर यांनी सहकार्य केले.
