Sanitation Inspector Padvika ; स्वच्छता निरीक्षक पदविका यांच्या आरोग्य कार्यशाळेत किटकजन्य आजाराचे मार्गदर्शन
नांदेड l माता रत्नेशवरी सेवाभावी शिक्षण संस्था झरी ता. लोहा जि. नांदेड येथील स्वच्छता निरीक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची आज दि.15 फेब्रुवारी रोजी आरोग्य कार्यशाळा शिबीर नेरली( कुष्ठधाम ) येथे आयोजित करण्यात आली होती. संस्थेच्या अध्यक्षा व स्वच्छता दूत श्रीमती सुमनबाई माधवराव पाटील झरीकर यांच्या प्रेरणादायी विचाराने सचिव प्रा. डॉ . सचिन पाटील झरीकर यांच्या मार्गदर्शनानुसार, प्राचार्य प्रा. डॉ. दिग्विजय देशमुख सर, समन्वयक प्रा. संतोष ठाकूर सर यांच्या नियोजनानुसार सदरील शिबीराचे आयोजन केले होते.
सर्व मान्यवर यांच्या येथोचित सत्कार करण्यात आला. सदरील आरोग्य शिबीरात राष्ट्रीय किटकजन्य रोग कार्यक्रम बाबत डॉ राजेश्वर माचेवार साहेब ( जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड ) यांच्या सुचनेनुसार जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक सत्यजीत टिप्रेसवार, व्यकटेश पुलकंठवार यांनी हिवत...
