उमरखेड, अरविंद ओझलवार। डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्या अंतर्गत कृषी महाविद्यालय उमरखेड येथील कृषी कन्यांनी बियाणे उगवण क्षमता संदर्भात उमरखेड तालुक्यातील बेलखेड या गावात शेतकत्यांना मार्गदर्शन केले.


घरी साठवलेले किंवा बाजारातून विकत आणलेले बियाणे पेरणीसाठी वापरायचे असल्यास प्रथम बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी करणे आवश्यक आहे. बियाण्यांची पुनर्पेरणी टाळण्यासाठी बीज उगवण प्रक्रिया करणे आवश्यक आहे, बियाण्यांच्या उगवण क्षमता तपासणी अंती उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी आढळून आल्यास जेवढ्या प्रमाणात उगवण शक्ती कमी आहे.


तेवढ्या प्रमाणात प्रती हेक्टरी जास्तीचे बियाणे पेरणी करिता वापरावे हे पटवून देण्यासाठी कृषी महाविदयालय उमरखेड येथील विद्यार्थिनी वैष्णवी शिंदे ,भारती गाईगोले, राखी भोयर ,विधी चोपडे ,समृध्दी अलोडे, श्रीज्या येती यांनी गोणपाठ या सरळ व सोप्या पध्दतीने बियाणे उगवण क्षमता कसे तपासायचे हे थोडक्यात समजून सांगितले.



सदर मार्गदर्शनाकरिता महाविदयालयाचे प्राचार्य श्री. एस. के. चिंतले सर व वनस्पती शास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री. वाय. एस. एस. वाकोडे सर व सह समन्वयक श्री. ए. एस. राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. तसेच बेलखेड येथील प्रथम नागरिक सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी वर्ग उपस्थित होते.



