नांदेड | बंजारा समाजातील तळागाळातील अनेक गरजवंतासाठी कायम तत्पर अशी प्रतिमा असलेल्या गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरूण चव्हाण यांनी नुकताच नांदेड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेशजी चेनीथल्ला यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आणि क्षणात त्यांच्या कॉग्रेस प्रवेशामुळे भोकर विधानसभाच नव्हे तर अनेक गोर बंजारा बहुल मतदार संघातील राजकीय गणितं बदलण्याची चिन्ह निर्माण झाली आहे
उच्च विद्याविभूषित, चारित्र्यसंपन्न,सद्गुणी असे व्यक्तिमत्व म्हणून श्री अरुण चव्हाण यांची बंजारा समाजासह अनेक बहुजनांमध्ये अनाथांचा नाथ व निराधारांचा आधार अशी त्यांची ओळख आहे.तसेच वंचित,शोषित,उपेक्षित, शेतकरी,कामगारांना न्याय मिळवून देणारा हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघितल्या जाते.
बंजारा समाजाला न्याय, हक्क,अधिकार मिळवून देणारा क्रांतीयोद्धा म्हणून अरुण चव्हाण भोकर मतदारसंघाचीच नव्हे विविध राज्यातील सामाजिक प्रश्नांची व समाज वेदनेची जाण असणारा संवेदनशील युवा नेता म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी गोर बंजारा समाजहितासाठी देशातील २३ राज्य व नेपाळ देशामध्ये फिरून व्यापक प्रमाणात समाजकार्य ते करीत आहेत.तसेच संपूर्ण देशातील गोर बंजारा समाजाच्या गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद भूषवित आहेत.
रायसीना स्टडी सेंटर च्या माध्यमातून शेक्षणिक जागृती …
रायसीना स्टडी सेंटर स्थापन करून गरजवंत गोरगरीब व भटक्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मोफत देत शिक्षणाचं महत्वपूर्ण कार्य देखील ते मागील अनेक वर्षापासून मोठ्या नेटाने करीत आहेत.त्याचप्रमाणे महाराष्ट्र,कर्नाटक,तेलंगणा राज्यांमध्ये बालसंस्कार केंद्र स्थापन करून लाखो बालकांना संस्कारित करण्याचे समाजपयोगी कार्य त्यांच्या हातून घडत आहे.
यासोबतच गोर सेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून देशभर समाजासाठी संघटनात्मक कार्य करण्यात येत आहे त्याबरोबरच ऊसतोड कामगारांसाठीच्या न्याय,हक्क,अधिकारांसाठी ऊसतोड कामगार संघटनेच्या माध्यमातून सक्रिय कामगिरी ते पार पाडत आहेत त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने भोकर मतदारसंघासह सह अनेक गोर बंजारा बहुल मतदार संघातील राजकीय गणिते बदलणार असल्याचे संकेत त्यांच्या वर्तुळातून व्यक्त होत आहेत ..