Arun Chavan ; गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांचा काँग्रेस प्रवेश..! – NNL
नांदेड | बंजारा समाजातील तळागाळातील अनेक गरजवंतासाठी कायम तत्पर अशी प्रतिमा असलेल्या गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरूण चव्हाण यांनी नुकताच नांदेड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेशजी चेनीथल्ला यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आणि क्षणात त्यांच्या कॉग्रेस प्रवेशामुळे भोकर विधानसभाच नव्हे तर अनेक गोर बंजारा बहुल मतदार संघातील राजकीय गणितं बदलण्याची चिन्ह निर्माण झाली आहे
उच्च विद्याविभूषित, चारित्र्यसंपन्न,सद्गुणी असे व्यक्तिमत्व म्हणून श्री अरुण चव्हाण यांची बंजारा समाजासह अनेक बहुजनांमध्ये अनाथांचा नाथ व निराधारांचा आधार अशी त्यांची ओळख आहे.तसेच वंचित,शोषित,उपेक्षित, शेतकरी,कामगारांना न्याय मिळवून देणारा हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघितल्या जाते.
बंजारा समाजाला न्याय, हक्क,अधिकार मिळवून देणारा क्रांती...
