नवीन नांदेड l तापमान कमी करण्यासाठी जनजागृती केली पाहिजे यासाठी यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे सांगून विद्यार्थ्यांमध्ये ग्लोबल वॅमिग विषयी जागरूकता मनात निर्माण होऊन ते प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न करतील, शाळेतील उपक्रमशिल शिक्षक एम.टी.कदम यांच्या हस्तलिखित विमोचन प्रसंगी माजी आमदार अमिताभाभी चव्हाण यांनी केले.


पृथ्वीच्या दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे मानवाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या तापमाणामुळे जलाशयातील पाण्याचे मोठया प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. त्यामुळे ओढे, नद्या,नाले, बारमाही वाहत नाहीत,वाढत्या तापमाना
मुळे अन्न धान्य उत्पादन कमी झालेले आहे. आज पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे. प्रचंड प्रमाणात प्रदूषण वाढलेले आहे. या सर्व गोष्टीमागे पृथ्वीचे वाढते तापमान हे एकमेव कारण आहे म्हणून पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.


विद्यार्थ्यांमध्ये ग्लोबल वॉर्मिंग विषयी जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथे ग्लोबल वार्मिंग संबंधित विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या हस्तलीखिताच्या विमोचन प्रसंगी माजी आमदार अमिताभाभी चव्हाण बोलत होत्या.


पुढे त्या म्हणाल्या इंदिरा गांधी हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले ग्लोबल वॉर्मिंगच्या उपायोजनाबद्दलचे हस्तलिखित परिणामकारक आहे या हस्तलिखिताच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंग विषयी जागरूकता त्यांच्या मनात निर्माण होऊन ते प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करतील. याप्रसंगी माजी राजमंत्री, शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी.पी.सावंत मंचावर उपस्थित होते.

संस्थेचे सचिव डी.पी.सावंत यांनी सांगितले की शाळेतील उपक्रमशील शिक्षक एम.टी.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले हे हस्तलिखित सर्व विद्यार्थ्यांना वाचण्यास व पाहण्यास द्यावे व अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवावे जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व तापमान वाढ कशामुळे होत आहे याचे त्यांना ज्ञान होईल व ते ग्लोबल वार्मिंग विषयी अभ्यास करून असे उपक्रम शोधून काढून तापमान वाढीवर उपाययोजना शोधतील.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जी.एम. शिंदे, उपमुख्याध्यापिका महाराज,ज्येष्ठ शिक्षक अण्णा गरड, ज्येष्ठ शिक्षक एम.टी.कदम, कार्यालयीन अधीक्षक एस.बी. घाटोळ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते


