HomeनांदेडEducation : वाढदिवसानिमित्त प्राध्यापीकेने घेतली विद्यार्थीनीच्या संपूर्ण शिक्षणाच्या दायित्वाची जबाबदारी

Education : वाढदिवसानिमित्त प्राध्यापीकेने घेतली विद्यार्थीनीच्या संपूर्ण शिक्षणाच्या दायित्वाची जबाबदारी

नवीन नांदेड l लहानांपासून तर मोठय़ांर्पयत वाढदिवस साजरा करण्याच फॅड समाजात मोठय़ा प्रमाणात पसरले आहे,कुणी पार्टी देतो तर कुणी वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवितात असतो परंतु शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय,सिडको नांदेड येथील प्रा.सौ.राशी कार्तिक काळे (शिंदे) यांनी आपल्या वाढदिवशी सिडको नांदेड येथील नरसिंह विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली वर्गातील कु.हिंदवी संभाजी शिंदे या विद्यार्थीनीच्या संपूर्ण शिक्षणाच्या दायित्वाची जबाबदारी घेतली त्याचा या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित या शालेय विद्यार्थीनीच्या आईचे निधन झाले असून वडील तीचे पालनपोषण करत नाहीत,ही मुलगी तीच्या आजीकडे राहते.या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाच्या दायित्वाची जबाबदारी प्रा.सौ.काळे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्ताने घेतली आहे.

प्रा.सौ.काळे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे नरसिंह विद्यामंदिर प्राथमिक शाळा सिडको,नांदेडच्या मुख्याध्यापिका सौ.व्ही.ए.एकुंडवार, सर्व शिक्षकवृंद व परिसरातील पालक वर्गाकडून कौतुक केले जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments