नांदेडमहाराष्ट्र

Give justice to the senior citizens : ज्येष्ठ नागरिकांना येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनातच न्याय द्या… नाही तर आमरण अन्न पाणी त्याग परवाणगी द्या..!

नांदेड| कुटूंबा परत्वे एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिक समूह हा नोंदनीकृत, अनोंदनी कृत मिळून एकून मतदार संख्येच्या ‘विस टक्के’ असून अत्यंत पोक्त, अनुभव संपन्न, निःस्पृह, तथा निर्मोही मतदार समूह आहे.त्यांच्या भरघोष मतदाना मुळेच महायुतीचे शासन बनले आहे. हे विसरू नका. ज्येष्ठ नागरिक समूहाने स्वातंत्र्य लढ्यापासून ते आज तागायत देश तथा राष्ट्र उभारणीत फार मोठा त्याग, योगदान तथा समर्पण केलेले आहे! देशाला त्यांनी विविध क्षेत्रात “अनेक रत्न” समर्पित करून देशाला समृद्ध केलेले आहे. आज पर्यंत या समूहाचा राज कारणीं धूरिणांनीं केवळ एक “महा व्होट बँक”म्हणूनच पाहिलेले आहे.बहुतांश हा मतदार समूह ग्रामिण व झोपड पट्टी भागात राहतो.हा मतदार समूह दुर्लक्षित उपेक्षित तथा वंचित राहिलेला आहे.

ज्येष्ठ नागरिक सद्याला अर्थिक दृष्ट्या अत्यंत वाईट परिस्थित जीवन जगत आहेत.वृद्धाप काळातील अनेक आजारांनी ते पिडित झालेले आहेत. त्यांच्या अंगातले त्राण गेलेले आहे. दिव्यांगत्वामुळे त्यांना कुणी काम व दामही देत नाही.त्याला भीकही मागता येत नाही.मुलांना व सुनांनाही ज्येष्ठ नागरिक आता ओझे झालेले आहेत.केव्हा एकदाचे ते मरतील व त्यांच्या पासून आपली सुटका होईल असे कुटूंबियांना झालेले आहे! केवळ मृत्यू येत नाही व विष प्राशन करून जीवन यात्रा संपवावी तर विष विकत घेण्यासही ज्येष्ठ नागरिकांकडे पैसा नाही!ते आता पूर्ते निर्धन व निराधार झालेले आहेत.जीवनास कंटाळले आहेत.

कुटूंब, समाज, लोक प्रतिनिधी, प्रशासन, तथा शासनही त्यांच्या प्रश्नांकडे कडे गांभिर्याने व सहानभूतीने पहात नाही. अशा परिस्थितीत ते सापडलेले आहेत. आज पर्यत स्थानिक लोक प्रतिनिधींना,अनेक नेते,अनेक मंत्री,आजी-माजी मुख्य मंत्रीजींना,महामहिम राष्ट्रपतीजींना,मा.पंत प्रधानांना ,अर्थ मंत्री महोदयांना विरोधी पक्ष नेत्यांना अनेक वेळा निवेदने देऊन झाली आहेत.पंधरा पंधरा हजार ज्येष्ठ नागरिकांची उन्हा-तानात,चिखल-पावसात प्रलंबित प्रश्न सोडवून घेण्या साठी व मानधन मागणी मोर्चे,धरणे अंदोलने करून झाली आहेत. तेंव्हा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे गांभिर्यांने व सहनुभूतीने पाहून सोडवावित अशी सकळ ज्येष्ठ नागरिकांची व फेस्काॅमची मागणी आहे. अन्यथा 23 मार्च पासून गोदावरी तिरावर पंधरा ते विस हजार ज्येष्ठ नागरिकांसह आमरण अन्न पाणी त्याग अंदोलना शिवाय ज्येष्ठ नागरिकांना पर्यायच उरलेला नाही.

त्यांच्या सर्व मागण्या पैकी किमान : “ज्येष्ठ नागरिक धोरण व ज्येष्ठां साठींचे पारित कायदे तथा नियमांची तंत्तोतंत्त अंमल बजावनी,”जागतिक ग्राहय साठ वर्षाचीच वयोमर्यादा”,”मुख्यमंत्री लाडके ज्येष्ठ माय-बाप योजना”, “केवळ गरिब, गरजवंत, दुर्लक्षित,वंचित तथा उपेक्षितांनाच 5000/- रू प्रतिमहा विना अट मानधन”, प्रवास आरक्षण व प्रवास भाडे सूट,सर्व कर मूक्ती,”ज्येष्ठ महिलां व पुरूष समूहातून किमान एक-एकजन, विधान परिषद व राज्य सभेवर घेण्याची तरतूद”,ज्येष्ठ नागरिकांना “राष्ट्रीय संपत्ती” म्हणून घोषणा तथा “राष्ट्राचा शिल्पकार” म्हणून निर्देशित करून प्राधान्याने सर्वच क्षेत्रात त्यांना सन्मान पूर्वक वागणूक व मुलभूत सुविधा मिळाव्यात”,अदि तरी मागण्या शासनाने मान्यकरून अंमल बजावनी करावी व “आमचे ज्येष्ठ नागरिक-आमचे कायम मजबूत स्थिर सरकार”(सबका साथ-सबका विश्वास-सबका विकास)साधावे एवढेच!

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!