नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीसांनी ट्रकला बनावट नंबर लावुन वापरणारे / चोरी करणारे/भंगार करुन विकणारे टोळीला पकडले असून, या कार्यवाहीमुळे बनावट वाहन तयार करणार्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत रस्ता सुरक्षा मोहीम अंतर्गत बनावट क्रमांकची माहीती काढुन वाहन चोरी, वाहन भंगार विक्री यांचेवर केसेस करण्याचे सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनाक 04/01/2025 रोजी वेळ 22:45 वाजण्याचे सुमारास गुप्तबातमीदारच्या माहीतीवरुन नॅशनल रोड लाईन्स बोन्डार बायपास नांदेड येथे ट्रकला बनावट नंबर टाकुण वापरत असल्याचे समजले.
त्यावरून छापा मारला असता आरोपी अमरजितसिंघ दलबिरसिघ बुटर वय 37 वर्ष, रा. दशमेश नगर बाफना ता.जि. नांदेड याचे ताब्यात एक अशोक लिलॉन्ड कंपनीचा चौदा टायरी ट्रक क्रमांक CG-23-K-7790 असा बनावट व नकलीकरण केलेला किमंती 17,00,000/- रुपयाचा मिळुन आल्याने त्या ट्रक क्रमांकाची खात्री केली असता सदर ट्रकचा क्रमांक MH-40BL-5993 असा असल्याची खात्री झाल्याने आरोपीकडे कागदपत्राची मागणी केली असता सदर ट्रकचे कोणतेही कागदपत्र मिळुन आले नाही.
सदर आरोपी हा त्याचा साथीदार आमृतपालसिंघ सिधु याचे संगणमताने ट्रकचे क्रमांक बदलुन शासनाची व पोलीसाची, विमा व फायनान्स कंपनीची दिशाभूल करुन फसवणुक करीत असल्याचे लक्षात आल्याने सदर आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गु.र.नं. 18/2025 कलम कलम 318 (2),336,339, 340 भारतीय न्याय संहीता- 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात एक आरोपी अटक करण्यात आला असुन त्यास मा. न्यायालयाकडुन 05 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे. इतर आरोपीचे शोधासाठी टीम तयार करण्यात आली आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशील कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, इतवारा, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नांदेड ग्रामीण, विश्वदीप रोडे, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण, पोलीस अमंलदार :- पोहेकॉ/518 गटलेवार, पोकों/427 जमीर, पोकों/3139 धम्मपाल कांबळे, सर्व नेमणुक पो.स्टे. नांदेड ग्रामीण सदरची कामगीरी करणाऱ्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि, रोडे ने. पो.स्टे. नांदेड ग्रामीण हे करीत आहेत.