trucks with fake numbers caught : ट्रकला बनावट नंबर लावुन वापरणारे / चोरी करणारे/भंगार करुन विकणारे टोळीला पकडले -NNL
नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीसांनी ट्रकला बनावट नंबर लावुन वापरणारे / चोरी करणारे/भंगार करुन विकणारे टोळीला पकडले असून, या कार्यवाहीमुळे बनावट वाहन तयार करणार्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत रस्ता सुरक्षा मोहीम अंतर्गत बनावट क्रमांकची माहीती काढुन वाहन चोरी, वाहन भंगार विक्री यांचेवर केसेस करण्याचे सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनाक 04/01/2025 रोजी वेळ 22:45 वाजण्याचे सुमारास गुप्तबातमीदारच्या माहीतीवरुन नॅशनल रोड लाईन्स बोन्डार बायपास नांदेड येथे ट्रकला बनावट नंबर टाकुण वापरत असल्याचे समजले.
त्यावरून छापा मारला असता आरोपी अमरजितसिंघ दलबिरसिघ बुटर वय 37 वर्ष, रा. दशमेश नगर बाफना ता.जि. नांदेड याचे ताब्यात एक अशोक लिलॉन्ड कंपनीचा चौदा टायरी ट्रक क्रमांक CG-23-K-7...
