नांदेड, गोविंद मुंडकर| आम्हाला फुकट स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे त्याची किंमत वाटत नाही. असे प्रतिपादन नरहर कुरुंदकर यांच्या कन्या शामल कुरुंदकर यांनी केले. ते सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी एक वाजता राज्य मराठी पत्रकार परिषद आणि स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचार मंच नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उपक्रमात नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रम कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी नाशिक येथील नंदन राहणे ,डॉ. शिवदास हमंद, गोविंद मुंडकर, दीपनाथ पत्की, राजकुमार बिर्ला, डॉ. अनिल शिरसाठ, प्रदीप जैन, नीरज अवस्थी यांची उपस्थिती होती. शामल पत्की पुढे म्हणाल्या की, , मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी ज्यांनी अहोरात्र झटले असे ज्ञात आणि अज्ञात हुतात्म्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण आणि गरजेचे आहे. उपेक्षित चळवळी यांच्या विषयी दस्तऐवज उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय प्रशासकीय यंत्रणा गांभीर्यपूर्वक कार्य करण्याची गरज आहे. यावेळी उपेक्षित चळवळी योद्धांचे चिरंजीव नंदन रहाणे नाशिक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. माझे वडील नांदेडच्या जेलमध्ये होते त्यांचा इतिहास माहीत असून सुद्धा त्यांचा रेकॉर्ड मिळत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तात्यासाहेब उर्फ नरसिंह देशमुख यांनी हुतात्मा स्मारकांच्या विषयी मांडलेले विचार यावेळी विशद करण्यात आले. 3 आक्टोंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती आणि चार ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन आणि पत्रकार पुरस्कार कार्यक्रमाविषयी यावेळी माहिती देण्यात आली