नवीन नांदेड l नांदेड दक्षिण तालुक्यातील असलेल्या जिल्हा परिषद सर्कल धनेगाव ,बळीरामपुर ,वाजेगाव मधील प्रत्येक गावातील समाज बांधवांनी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या अमर उपोषणात सहभागी झालेल्या समाज बांधवांच्या माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी राहेगाव, भायेगाव, किक्की गावात जाऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


यावेळी गावातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व गावापातळीवरील मान्यवर यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरागे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.


यावेळी राज्यातुन प्रत्येक जिल्ह्याततुन व तालुक्यातील प्रत्येक गावातून समाजबांधव जेष्ठ नागरिक,युवक महिला या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या, नांदेड तालुक्यातील असलेल्या वाजेगाव,बळी रामपुर,व नवनिर्वाचित धनेगाव मतदार संघातील अनेक गावांतील शेकडो युवक गावातुन वाहनाने रवाना झाले होते, आरक्षण मिळाल्यानंतर समाजबांधव गावी येताच ग्रामस्थांनी उत्साहात व फटाक्यांची आतषबाजी व ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले होते.


मनोहर पाटील शिंदे यांनी वरील तिन्ही सर्कल मधील अनेक गावांत जाऊन सहभागी समाज बांधवांचा सत्कार केला,10 सप्टेंबर रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी भायेगाव , किक्की,राहेगाव वरील तिन्ही गावात जाऊन सहभागी झालेल्या समाजबांधव यांच्या सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच विलास पाटील इंगळे,रवि देशमुख, ऊपसरपंच बालाजी पाटील कोल्हे,अशोक पाटील कोचार, प्रल्हाद कोल्हे,दता पाटील खोसडे, उध्दव देशमुख, सदाशिव पाटील, यांच्या सह तिन्ही गावातील जेष्ठ नागरिक, युवक व गावपातळीवर मान्यवर यांच्यी उपस्थिती होती.



