नांदेड| शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशिर शेतीसाठी फुलशेती आणि फळबाग लागवड अत्यंत महत्वाची ठरत आहे. विकसित कृषी संकल्प अभियानाच्या दुसऱ्या दिवशी बेळकोणी बु. बेळकोणी खु. कासराळी, काला खू., कार्ला बू व माचनुर येथे विविध विषयावर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.


या अभियानाचा प्रमुख उद्देश आधुनिक शेतीला चालना देणे आणि शेतकऱ्यांना उन्नत तंत्रज्ञानाची माहिती देणे हा आहे. या कार्यक्रमात कृषी संशोधन संस्थान कृषी विज्ञान केंद्र प्रगतीशील शेतकरी यांचा सक्रिय सहभाग होता.


दुसऱ्या दिवशीचे ठळक मुद्दे
फुलशेती व फळबाग लागवडीचे महत्व-बाजारातील वाढती मागणी आणि उत्पादन वाढीचे फायदे. जैविक शेती आणि नैसर्गिक पध्दती-पर्यावरणपूरक व टिकाऊ शेतीसाठी उपयुक्त उपाय. तंत्रज्ञानाचा वापर-आधुनिक पध्दतीद्वारे उत्पादनवाढ आणि गुणवत्ता सुधारणा.


शेतकऱ्यांनी या अभियानात उत्साहाने भाग घेतला आणि त्यांचा अनुभव एकमेकांसोबत आदानप्रदान केला. या कार्यक्रमात राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचे डॉ. श्रीगुरु, राहुल डमाळे, भारतीय ऊस संशोधन केंद्र, प्रवरानगरचे डॉ. थोरात, डॉ. बोरसे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. कृष्णा अंभुरे , डॉ. निहाल मुल्ला, प्रशांत शिवपनोर, बालाजी चंदापुरे, प्रभूदास उडतेवार, संतोष लोखंडे उपस्थित होते.



