Wednesday, May 13

Tag: is the need of the hour

Bapurao Rathod : बंजारा समाजास एकत्र करणे ही काळाची गरज – बापूराव राठोड

Bapurao Rathod : बंजारा समाजास एकत्र करणे ही काळाची गरज – बापूराव राठोड

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
धाराशिव| ऑल इंडिया बंजारा सेवा संघ ही संघटना 1953 मध्ये वसंतराव नाईक साहेबांनी स्थापन केले असून, बंजारा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तेव्हापासून ते आज पर्यंत या संघटनेच्या अनेक लोकांनी काम केलेलं आहे. त्याच संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी बापूराव राठोड यांची निवड झाल्याबद्दल व त्याचबरोबर समाजाच्या विविध प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी धाराशिव जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बापूराव राठोड यांनी समाजाचे संघटन उभे करून एकत्रित समाजाच्या प्रश्नासाठी लढा उभा करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या बैठकीस यांच्यासोबत संभाजीनगरचे वित्त लेखा अधिकारी उत्तम चव्हाण, लातूर मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, भाजपा शहर उपाध्यक्ष एड. नितीन राठोड,सुनिल नायक,प्रा. प्रकाश राठोड, डॉ. विलास राठोड, विनोद चव्हाण आदी उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन धाराशिव जिल्ह्यातील समस्त बंजारा समाजातर्फे करण्या...
Floriculture and fruit gardening : फुलशेती व फळबाग करणे काळाची गरज- डॉ. श्रीगुरे

Floriculture and fruit gardening : फुलशेती व फळबाग करणे काळाची गरज- डॉ. श्रीगुरे

कृषी, नांदेड
नांदेड| शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशिर शेतीसाठी फुलशेती आणि फळबाग लागवड अत्यंत महत्वाची ठरत आहे. विकसित कृषी संकल्प अभियानाच्या दुसऱ्या दिवशी बेळकोणी बु. बेळकोणी खु. कासराळी, काला खू., कार्ला बू व माचनुर येथे विविध विषयावर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानाचा प्रमुख उद्देश आधुनिक शेतीला चालना देणे आणि शेतकऱ्यांना उन्नत तंत्रज्ञानाची माहिती देणे हा आहे. या कार्यक्रमात कृषी संशोधन संस्थान कृषी विज्ञान केंद्र प्रगतीशील शेतकरी यांचा सक्रिय सहभाग होता. दुसऱ्या दिवशीचे ठळक मुद्दे फुलशेती व फळबाग लागवडीचे महत्व-बाजारातील वाढती मागणी आणि उत्पादन वाढीचे फायदे. जैविक शेती आणि नैसर्गिक पध्दती-पर्यावरणपूरक व टिकाऊ शेतीसाठी उपयुक्त उपाय. तंत्रज्ञानाचा वापर-आधुनिक पध्दतीद्वारे उत्पादनवाढ आणि गुणवत्ता सुधारणा. शेतकऱ्यांनी या अभियानात उत्साहाने भाग घेतला आणि त्यांचा अनुभव एकमे...
Cultivation of reading culture by students : विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज – शेषराव पाटील -NNL

Cultivation of reading culture by students : विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज – शेषराव पाटील -NNL

करियर, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विद्यार्थ्यांना बालवयात वाचनाची गोडी निर्माण व्हावी. वाचाल तर वाचाल हे ध्येय उराशी बाळगून. वाचनाचे त्यांच्या मनावर संस्कार निर्माण व्हावेत. हा प्रेरणादायी हेतू ठेवून विद्यार्थ्यांनी जीवनभर वाचन केले पाहिजे. वाचनामुळे संस्कारक्षम विद्यार्थी घडू शकतो. म्हणून वाचन ही लोक चळवळ व्हावी. वाचन हे प्रगतीचे लक्षण व सर्वांगीण विकासाचा पाया असल्याने विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज असल्याचे मत उपक्रमशील जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक शेषराव पाटील यांनी व्यक्त केले. वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे. तसेच वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. अशा या वाचनाचे महत्त्व सांगणारा ‘वाचन प्रेरणा दिन माहूर शहरातील नवी अबादी जिल्हा परिषद शाळेत आज दिनांक १५ रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. वाचाल तर वाचाल', '...
error: Content is protected !!