नांदेड| उ.म.प्रा.वि.फेस्काॅमच्या प्रादेशिक विभागीय महामेळाव्यास उपस्थित (प्रिंट व मेडिया जानकिरांच्या आंदाजानुसार) दहा ते पंधरा हजार ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.आजचा हा उ.म.प्रा. विभागीय ज्येष्ठ नागरिकांचा नुस्ताच महा मेळावा नाही, तर हा “प्रबोध नात्मक आनंद महा मेळावा ठरला” आहे. मेळाव्यास आलेले ईपीएस95 सह सर्व ज्येष्ठ तथा अति ज्येष्ठ महिला पुरूष हे खरे गरिब, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित,निराधार, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा माता, निराश्रीत, बेसहारा, तथा दिव्यांग,स्वताःहोऊन उपस्थित होते.
या मेळाव्यास व्यास पिठावर जिल्ह्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष मा.जिल्हाधिकारी अभिजितजी राउत,अत्यंत संवेदनशिल न्यायमूर्ती मा.साळवेजी व दलजितजी कौर द्वय,सामाज कल्यान तथा न्याय विभागाचे सह आयुक्त मा. शिवानंदजी निमगीरे,लंगर सहाब गुरूद्वारा कौठा डेराचे प्रमूख मा.संत बाबा कुलदिप सिंघजी, बजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी बार्हाळे, मुंबई-पुण्याहून आलेले अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष मा.दिगंभर चापके, फेस्काॅमचे आजी-माजी अध्यक्ष मा.अन्नासाहेब टेकाळे व अरूण रोडे,उपाध्यक्ष अशोक तेरकर, मुख्य सचिव मा. चंद्रकांत महामूनी,EPS95 चे प्रांत्ताध्यक्ष मा.श्री.स. ना.अंबेकर, उ.म.प्रा. वि.फेस्काॅमचे चे उपाध्यक्ष मा. अनंत आचार्य, तसेच द.म.प्रा.वि. फेस्काॅमचे मा.अध्यक्ष प्रा.बि.के. पाटील, जोशी.आदि आवर्जून उपस्थित होते.
महा आनंद मेळाव्याचे उद्घाटण नादेड जिल्ह्याचे अत्यंत कर्तगार,ज्येष्ठ नागरिकांचे चाहाते जिल्हाधिकारी आभिजित राऊत साहेबांच्या शुभ हस्ते झाले. कौठा लंगरसाहेब गुरूद्वारा डेर्याचे प्रमुख संत बाबा कुलदिप सिंघजीनी मेळाव्यास शुभाशिर्वाद दिले. मान्यवरांनी महा मेळाव्यास यथोचित मार्ग दर्शन केले. मेळाव्याचे संयोजक डाॅ.हंसराज वैद्य यांनी शासनास महा मेळाव्याच्यझ निमित्ताने शासनास अमरण उपोषणाचा गंभीर इशारा दिला व सांगीतले की,आमच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य करा,आता जास्त अंत पाहू नका.
सकळ ज्येष्ठ नागरिकांचे सर्व शासकीय योजनां साठी, मुलभूत सुख,सुविधा साठी “वय वर्ष साठच ग्रहाय धरा”. ज्येष्ठ नागरिकांचे सुधारित धोरणाची तंत्तोतंत अंमल बजावनी त्वरित करा. सकळ ज्येष्ठ नागरिक देशाचा तथा राष्ट्राचा “शिल्पकार”आहे. खर्या अर्थाने देशाची तथा राष्ट्राची खरी संपत्ती आहेत! “राष्ट्रीय संपत्ती” घोषित करा. आमचा राष्ट्र तथा देशासाठी सहभाग,त्याग तथा समर्पण लक्षात घेउन “एक महिला व एक पुरूष विधान परिषद व राज्य सभेवर” पाठविण्याची तरतूद करा. सकळ ज्येष्ठ नागरिकांचा स्वातंत्र्य चळवळ ते आज तागायत राष्ट्रोन्नतीत सहयोग,त्याग व समर्पण लक्षात घेऊन निव्वळ तथा खास त्यांच्यासाठीच म्हणून “ज्येष्ठ लाडके माय-बाप व ज्येष्ठ आजी आजोबा योजना कार्यान्वित करा, योजना राबवा. शेजारिल आंध्र,कर्नाटक व तेलंगानादि राज्या प्रमाणे मान मान-सन्मान म्हणून कुठलाही “कर भरण्यास मज्जाव करू नका,कर भरण्यास लाऊ नका. एकूण लोक संखेच्या 20% अनुभव संपन्न हुकमी मतदाता समूह,तथा महा व्होट बँक म्हणून आमचा टक्का लक्षात घेऊन किमान 3500 ते 5000/-रू प्रतिमहा मानधन विना अट सरळ गरिब गरजवंंत ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यावर भरा!
8)सरसकट सकळ ज्येष्ठ नागरिकांनां मुलभूत गरजा, सेवा तथा लाभ शासनाच्या वतिने द्या 9) 2007चा, पारित कायदा, 2010चे पारित नियम,2013चा पारित कायद्यांची काटेकोर अंमल बजावनी करा. 10)याच हिवाळी अधिवेशनात वरिल मागण्यांचा किंवा 1 1/2 ते दोन महिण्यात निर्णय घ्या अन्यथा आम्हा आजच्या पंधरा हजार ज्येष्ठ तथा अति ज्येष्ठांना अमरण उपोषणास बसण्यास भाग पाडू नका.अंत पाहू नका. आम्ही भिक मागत नाही.हक्क मागत आहोत.आमच्या जिविताचे कांही बरे वाईट झाल्यास याची पूर्ण जवाबदारी राज्य व केंद्र शासनाची राहिल याचे भान ठेवा . 11)सकळ ज्येष्ठ नागरिकांचा व EPS 95 च्या कार्य कर्त्याचा, राज्य तथा केंद्र शासनाने निवृती पर्यंत फक्त सेवा व मतदाना साठीच वापर करून घेतला आहे.न मागता, गरज नस्ताना लाडक्या बहिणीच्या योजने साठी पैसा कमी, पडू दिला जाणार नाही.