Adv.Avinash Rathod | संधी मिळाल्यास ज्वलंत मुद्यांवर लढणार विधानसभा – ॲड.अविनाश राठोड – NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत राहणाऱ्या किनवट/माहूर विधानसभेत आमदारकीच्या उमेदवारी वरून भाजपाच्या ईच्छूकान मध्ये घमासान रंगले आहे. त्यातच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.अविनाश राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीकरीता आपली तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सध्या राज्यात महायुतीचे सरकार असून सत्ता पक्षाचेच आमदार विद्यमान स्थितीत किनवट /माहूर क्षेत्राचे नेतृत्व करत आहे. दरम्यान भाजपने संधी दिली तर आरोग्य, शिक्षण, पर्यटन, शेती व रोजगार या ज्वलंत मुद्यांवर निवडणूक लढणार असल्याची इच्छा ॲड.अविनाश राठोड यांनी त्यावेळी व्यक्त केली. सदर काही मुद्यांना विधानसभा मुकली असून आपल्या कल्पनेतील विधानसभा कृतीतून खरी करून दाखविणार असल्याचे मत त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना राठोड यांनी व्यक्त केले.

स्थानिक शासकीय विश्रामगृहात दि.२९ जुलै रोजी पत्रकार परिषदेत आयोजन करण्यात आले होते. बंजारा आणि आदिवासी बहुल समाजाच्या दृष्टीने प्रयत्न करतांना शेती,रोजगार,शिक्षण व पर्यटन आदी बाबींसाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे अत्यंत सावधगिरी बाळगून दिल्याने त्यांच्यातील समयसूचकता आणि तत्परता लगेच दिसून आली.स्थानिक भाजप आमदारां विरुद्ध आपण आहात काय? या प्रश्नाचे उत्तर देताना पक्षातील लोकशाही स्पष्ट करतांना एक युवा म्हणून मलाही उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे.

असे उत्तर देऊन आमदारांशी विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.संभाव्य पाच ते सहा उमेदवारांशी समन्वय साधून आहात काय असे विचारता सर्वांशी अत्यंत चांगले सलोख्याचे संबंध असल्याचे अविनाश राठोड म्हणाले. २००५ पासून भाजपचा पदाधिकारी म्हणून कार्यरत असून किनवट/ माहुर या मतदार संघातील वाडी,तांडे व गावे फिरून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असल्याचे सांगून पक्ष संघटनेच्या दृष्टीनेही प्रयत्न करनार असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी आभार मानून पत्रकार परिषदेचा समारोप केला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button