श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यात गत काही वर्षापासून पञकारीतेच्या नावाखाली खंडणीखोरांची संख्या प्रामुख्याने वाढलेली दिसत आहे. गाडीवर प्रेस लिहून तसेच एखाद्या पेपरचे कार्ड दाखवून शासकीय कार्यालय व व्यावसायीकांकडे जाऊन पत्रकार असल्याचा रोब मारताना दिसत आहेत. तालुक्यातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषि कार्यालय, आरोग्य विभाग, पोलीस स्टेशन, शिक्षण विभाग,वन विभाग, बांधकाम विभाग, बँक व बांधकाम कंञाटदारासह इतर कार्यालयात जाऊन पत्रकार असल्याचे सांगून कर्मचा-यांना धमकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलल्या जात आहे. तर काही लोकांनी तर पञकारीतेच्या आड अवैध व्यवसाय चालु केले (Extortion in the name of journalism) आहे. पोलीस प्रशासनाने आशा खंडणीखोर बह्रादरांचा शोध घेवून कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.


लोकशाहीचा चौथा आधारस्तब असलेल्या पञकारीतेच्या पविञ मळ्यात आज मितीस काही गाढवे शिरल्याचे वास्तव आहे.पञकारीतेचा कुठल्याही प्रकारचा गंध नसतांना केवळ स्वार्थापायी या मध्ये बहुतांश गुंड प्रवृत्तीची व कोणत्याही गोष्ठीची जबाबदारी किव्हा भान नसलेल्या लोकांनी प्रवेश केला असल्याने एखाद्या व्यवसायीकांना किंव्हा शासकिय अधिकार्यांना,कर्मचार्यांना टारगेट करुण त्यांच्यावर गंबीर आरोप करीत त्यांच्या विरोधात बदनामी कारक वृत्त प्रकाशित करुण पैस्याची मागणी होत असलेले प्रकरण समोर येत आहे.

अशा वेळी वृत्त प्रकाशित करुण सुध्दा पैसे मिळत नसेल तर त्यांच्यावर खोट्या तक्रारी किंव्हा माहितीच्या अधीकाराचे शस्ञ उघारुण पविञपणाची झालर पाघंरुण ञास देत असल्याचे नांव न सांगण्याच्या अटीवरुण सरकारी अधिकार्यांनी सांगितले आहे. तर काही तोतया पत्रकार अवैध व्यावसायीकांकडून ओली पार्टी खात असल्याची चर्चा देखील सध्या माहूर तालुक्यात आहे. अशा तोतया आणि बोगस पत्रकारांमुळे व्यवसायीकांना तसेच शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ज्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात आहे किंवा त्यांना पत्रकारितेच्या नावाखाली धमकवलं जात आहे. अशा अधिकारी, कर्मचार्यांनी कोणतीही तमा न करता पोलिसांमध्ये तक्रार करून अशा खंडणी बहादुर आणि तोतया पत्रकारांवर आळा घालायला हवा. पोलिसांनी देखील असे खंडणीखोर पत्रकार शोधून त्यांच्यावर अंकुश लावणे गरजेचे झाले आहे.
