नवीन नांदेडl संततधार पावसातही म्हाडा काॅलनीतून मधोमध वाहणारा नाला कचरा अडकून तुंबतो,त्यामुळे नाल्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरते, पण रविवारी पहाटेपासूनच पाऊस सुरू झाला. रविवारी सुट्टी असतानाही मनपाचे सफाई कर्मचारी आनंदा पंडित, प्रल्हाद हैबतकर आणि रामा वाघमारे यांनी भरपावसात नवीन कौठा, म्हाडा कॉलनीत नेहमी तुंबणा-या नाल्यातील कचरा काढला आणि पाण्याचा प्रवाह मोकळा करून दिला.
एरवी सफाई कामगारांच्या नावाने बोटं मोडली जात असतांना, लोकांच्या घरात पावसाचं पाणी घुसू नये म्हणून या सफाई कामगारांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे, महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याजवळ असलेल्या म्हाडा काॅलनीच्या मधोमध नाला आहे,म्हाडा काॅलनीच्या वरच्या भागातून पावसाच्या पाण्याचा येवा वाढल्याने हलक्या पावसातही कच-यामुळे नाला तुंबतो आणि नाल्याच्या परिसरातील घरांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान होत असते.
या नाल्याची वेळोवेळी साफसफाई केली जाते. पण यावेळी नाल्यात सतत कचरा पडत असल्याने तो तुडूंब भरला.शनिवारी सायंकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केली होती. मध्यरात्रीनंतर पावसालाही सुरूवात झाली, रविवारी सकाळी म्हाडा काॅलनीतील नाला तुडूंब भरून वाहत होता. पाऊस कमी आणि अडकलेला कचरा जास्त यामुळे नाला तुंबला होता. एरवी मागणी करूनही वेळेवर न येऊ शकणारे सफाई कामगार नाल्यातील कचरा काढण्यासाठी सरसावले.
रविवारी सुट्टी असतानाही मनपा सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक,स्वचछता विभाग प्रमुख वसिम तडवी,सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड,याचा मार्गदर्शनाखाली मनपाचे स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे यांच्या मार्गदर्शना खाली सफाई कामगार आनंदा पंडित,प्रल्हाद हैबतकर ,आणि रामा वाघमारे यांनी भरपावसात नवीन कौठा, म्हाडा कॉलनीत नेहमी तुंबणा-या नाल्यातील कचरा काढला आणि पाण्याचा प्रवाह मोकळा करून दिला. एरवी सफाई कामगारांच्या नावाने बोटं मोडली जात असतांना, लोकांच्या घरात पावसाचं पाणी घुसू नये म्हणून या सफाई कामगारांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे.