नवीन नांदेड l भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त युवाशक्ती मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरास युवकासह , नागरिक व महिलांनी एकुण 525 रक्तदान बाॅटल्या रक्त संकलन करण्यात आले,शिबीराला ऊत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.

दरवर्षी प्रमाणे याही अठराव्या वर्षी मनपाच्या माजी नगरसेविका इंदुबाई शिवाजीराव पाटील घोगरे,युवा शक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील घोगरे यांच्या वतीने 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ नागरिक अशोकराव लोंढे पाटील यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी छत्रपती शिवाजीमहाराज
यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक पाटील लोंढे, प्रमुख पाहुणे बाबुराव पांडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्या वत्सला पुयड, तुकाराम पाटील झरीकर, श्याम वडजे पाटील,कामाजी कदम सरपंच, दत्ता पाटील मोरे, माजी सरपंच माऊली कदम जानापुरी , साईनाथ पाटील टरके,आकाश येवले, सरपंच मार्कन्ड दत्ता धुमाळ ,गणेश सावंत,सरपंच विलास इंगळे,कैलास कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य ,अवधुत पवार,दिलीप कदम, प्रल्हाद टेहरे, शशीकांत गाढे यांच्या सह नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिवन अर्पण रक्त पेढी,व शासकीय रुग्णालय येथील कै.शंकरराव चव्हाण रक्तपेढी यांच्या वतीने शिबीरातील रक्तदाते यांच्ये संकलन केले.

शिबीर यशस्वीतेसाठी युवा शक्ती मित्र मंडळाच्ये गजानन कते,संतोष गुटे,प्रकाश घोगरे,अंनिस घोगरे,मंगेश कदम, योगेश सोमाणी,मुन्ना शिंदे,गोपी कृष्ण पापुलवाड,मयुरअंमिलकंठवार , रमाकांत गाढे,भास्कर पाटील, सचिन चाकुरकर, आनंद पावडे,ऋषी वानखेडे,अनिल मोरे, कैलास हंबर्डे, बालाजी शिंदे यांनी परिश्रम घेतले.या शिबिरात नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील अनेक गावांतील व सिडको हडको परिसरातील युवक नागरीक यांनी सहभाग नोंदविला.
