Manpa CIDCO Regional Office ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पूरग्रस्त निवासस्थानाचे तलाठी व वसुली लिपीक यांच्या कडून सर्व्ह – NNL

नवीन नांदेडl नांदेड येथे ३ व ४ सप्टेंबर रोजी गोदावरी नदीला आलेल्या महापुरा नंतर गोदावरी नदीकाठी असलेल्या महानगर पालिका हद्दीत असलेल्या सिडको क्षेत्रीय कार्यालय परिसरातील वसरणी, जुना कौठा ,वाघाळा शाहूनगर भागासह अन्य परिसरातील निवासस्थानी पाण्याखाली व संततधार पावसाने सखल भागात गेलेल्या पाण्यामुळे जिवनाश्यक वस्तू नासधूस झालेल्या घराच्या व मालमत्तेचा सर्व्ह वसरणी,कौठा वाघाळा ,भागात तलाठी व क्षेत्रीय कार्यालय कर निरीक्षक,वसुली लिपीक यांनी सुरू केला असून जवळपास ३०० ते ४०० निवासस्थाने पूरग्रस्त झाले आहेत.

नावामनपाचा हद्दीत असलेल्या गोदावरी नदीकाठी भाग व नदी बॅक वॉटर असलेल्या भागासह सखल भागात गोदावरी नदीला आलेल्या महापुरा मुळे प्रभाग क्रमांक १९ व २० मधील वसरणी भागातील पंचवटी, शंकरनगरन,मुरमुरा गल्ली,महेश्वरी भवन परिसर यासह वाघाळा भागातील शाहूनगर भागासह अनेक परिसरातील निवासस्थानी संसार उपयोगी जिवनाश्यक वस्तू नासधूस झाली काही नागरीकांनी अपती व्यवस्थापन अंतर्गत उभारलेल्या पाच निवारण केंद्रे उभारण्यात आली होती या ठिकाणी सहारा घेतला होता.

मनपा आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे व नांदेड तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली ऊपायुक्त अजितपाल संधु ,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या आदेशा नुसार सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड व कर निरीक्षक मारोती सारंग, प्रकाश दर्शने,संजय नागापूरकर, वसुली लिपीक मालु एनफळे, महेंद्र पठाडे, रमेश यशवंतकर, दिपक जौधंळे, रविंद्र पवळे, विवेकानंद लोखंडे,राहुल पाईकराव,यांनी पाहणी केली.

अखेर जिल्हाधिकारी नांदेड अभिजीत राऊत यांच्या आदेश नुसार मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिन दिवशीय तलाठी व मनपा कर निरीक्षक, वसुली लिपीक संयुक्त पाहणी अहवाल घेण्यात आला यावेळी तलाठी वसरणी सुर्यवंशी,जुना कौठा तलाठी श्रीरामे, वाघाळा चंदकांत कंगळे ,यांनी पाहणी केली असून अहवाल तयार केला आहे, जवळपास सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जवळपास ४०० निवासस्थाने पाहणी झाली असून चौथ्या दिवशी ही होणार असल्याचे समजते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button