Dr. Shiv Prasad Lakhpatre | ओम हाॅस्पीटल कडून वैकुंठ धाम स्मशान भूमीच्या विकासात्मक कामांसाठी देणगी – NNL

हिमायतनगर, दत्ता शिराणे| हिमायतनगर शहरातील प्रसिद्ध ओम हाॅस्पीटल चे संचालक डॉ. शिवप्रसाद लखपत्रे यांनी येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत विकासात्मक कामे करण्यासाठी देणगीच्या रूपात पाच आकडी रक्कम दिली आहे. त्यांचे वैकुंठ धाम स्मशान भुमिच्या समितीकडून स्वागत करण्यात आले आहे.

डाॅ. शिवप्रसाद लखपत्रे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. गोरगरीब रुग्णांसाठी ते नेहमीच सेवा देण्यासाठी तत्पर राहून काम करीत असतात. रात्री बे रात्री आलेल्या रुग्णावर ते मायेने उपचार करून त्याचे मनोबल वाढविण्याचे काम ते सातत्यानं करतात. सामाजिक कार्यातही ते नेहमीच आपले योगदान देत असतात.

वैद्यकीय सेवेत आपला ठसा कायम ठेवत त्यांनी सामाजिक कामासाठी ही योगदान दिले असून वैकुंठ धाम स्मशानभूमीत वृक्षलागवड व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देणगीच्या रूपात मोठी रक्कम त्यांनी समितीकडे अदा केली असून, त्यांच्या या सामाजिक कार्याचे शहरात मोठे कौतुक होत आहे.

यावेळी राज दत्त सुर्यवंशी, वामनराव मिराशे पाटील वडगावकर, विनोद आरेपल्लू आदिंची प्रामूख्यानं उपस्थिती होती. हिमायतनगर शहरातील ओम हाॅस्पीटलचे संचालक डाॅ. शिवप्रसाद लखपत्रे यांच्या कडून स्मशान भूमीच्या विकासात्मक कामासाठी देणगी.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button