Dr. Laxman Sankade appointed as Treasurer of Veterinary Practitioners Associatio नांदेड| पशु चिकित्सा व्यवसायी संघटनेच्या नांदेड जिल्हा कोषाध्यक्षपदी डॉ. लक्ष्मण सनकाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


संघटनेचे राज्यसचिव डॉ. एन. पी. कानोले यांच्या अध्यक्षतेखाली दि. २९ जून रोजी पार पडलेल्या बैठकीत पशु चिकित्सा व्यवसायी संघटनेची नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी डॉ. राहुल चव्हाण, उपाध्यक्षपदी डॉ. दीपक जाधव, कोषाध्यक्षपदी डॉ. लक्ष्मण सनकाडे, सचिवपदी डॉ. शिवप्रसाद तेलंनवार, महिला उपाध्यक्षपदी डॉ. छाया सूर्यवंशी तसेच डॉ. पार्वती वाघमारे यांची निवड करण्यात आली.


या बैठकीस डॉ. श्रीनिवास इंगोले, डॉ. शिवाजी डाकोरे, अंजना जमदाडे, डॉ. सुमेध बनसोडे, डॉ. डी.बी. इंगळे, डॉ. अजगर , डॉ. बी. एम. ढगे, डॉ.पुजारी, डॉ. मेंढेवार, डॉ. वाघमारे, डॉ. डी. डी. गायकवाड, डॉ. एन. जी. कल्याणकर, डॉ. पवार यांची उपस्थिती होती. डॉ. लक्ष्मण सनकाडे यांची निवड झाल्याबद्दल सुरेश काशिदे, अविनाश चमकुरे, यशपाल भोसले, रघुनाथ पोतरे, विलास आडे, कुवरचंद मंडले, प्रशांत गवळे, अर्जुन राठोड, हैदर अली, सुरेश आंबटवार, सचिन कावडे, नारायण गायकवाड, कमलाकर बिरादार, प्रदिप घुगे, दिपंकर बावस्कर, दिनेश येरेकर, दिनेश मुधोळकर, प्रविण देशमुख आदीसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.




