HomeनांदेडDeglur Fire ; सलग तिसऱ्या दिवशी देगलूर शहरातील बसवेश्वर चौकातील डीपी जळून...

Deglur Fire ; सलग तिसऱ्या दिवशी देगलूर शहरातील बसवेश्वर चौकातील डीपी जळून खाक

देगलूर। शहरातील सराफा बाजार बसवेश्वर चौक येथील डीपी मध्ये ऑइल नसल्यामुळे डीपी जळून खाक झाली आहे. सलग तिसरया दिवशी शहरातील डीपी जळालयाची घटना घडल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे विद्युत वितरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

देगलूर शहरातील रोड भागातील बसवेश्वर चौकामधील डी.पी. मध्ये ऑइल नसल्यामुळे, गेल्या काही दिवसापासून ऑइल लिकेज होत होते. ऑइल कमी होण्याचा प्रकार घडत असतानाही महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले होते.

डीपीची दुरुस्ती व देखभाल वेळेवर न केल्याने ता. ४ मे रविवारी दुपारी १-४०० वाजता ऑइल नसल्यामुळे डीपी जळून खाक झाली आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवीत हानी झाली नाही. या घटनेची माहिती धनाजी जोशी यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना दिल्यामुळे महावितरण कंपनीचे कर्मचारी येण्याअगोदर आजुबाजूच्या रहिवाशांनी पाणी टाकून तात्काळ आग विझविली.

आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी मदत केल्यामुळे आग इतरत्र पसरली नाही. दुपारचे रणरणते ऊन त्यात ही आगीची घटना घडल्यामुळे व त्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments