Wednesday, May 13

Tag: DP at Basaveshwar Chowk in Deglur city burnt down

Deglur Fire ; सलग तिसऱ्या दिवशी देगलूर शहरातील बसवेश्वर चौकातील डीपी जळून खाक

Deglur Fire ; सलग तिसऱ्या दिवशी देगलूर शहरातील बसवेश्वर चौकातील डीपी जळून खाक

नांदेड, लाइफस्टाइल
देगलूर। शहरातील सराफा बाजार बसवेश्वर चौक येथील डीपी मध्ये ऑइल नसल्यामुळे डीपी जळून खाक झाली आहे. सलग तिसरया दिवशी शहरातील डीपी जळालयाची घटना घडल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे विद्युत वितरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. देगलूर शहरातील रोड भागातील बसवेश्वर चौकामधील डी.पी. मध्ये ऑइल नसल्यामुळे, गेल्या काही दिवसापासून ऑइल लिकेज होत होते. ऑइल कमी होण्याचा प्रकार घडत असतानाही महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले होते. डीपीची दुरुस्ती व देखभाल वेळेवर न केल्याने ता. ४ मे रविवारी दुपारी १-४०० वाजता ऑइल नसल्यामुळे डीपी जळून खाक झाली आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवीत हानी झाली नाही. या घटनेची माहिती धनाजी जोशी यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना दिल्यामुळे महावितरण कंपनीचे कर्मचारी येण्याअगोदर आजुबाजूच्या रहिवाशांनी पाणी टाकून तात्काळ आग विझविली. ...
error: Content is protected !!