नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सलग तिन दिवस झालेल्या खूनाचा घटनेनंतर परिसरात व शहरात खळबळ उडाली, या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट देऊन तिन्ही घटनेचा आढावा घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालय येथुन पाठवुन व शहर वाहतूक शाखा मार्फत विविध भागात रस्ता सुरळीत होण्यासाठी व गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


ग्रामीण पोलीस स्टेशन येथे १८ जुलै रोजी सतत तिन दिवस झालेल्या खूनाचा गुन्हा संदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, यांनी भेट घेऊन तिन्ही गुन्हयातील माहिती घेऊन घटनेचा आढावा घेतला व उपस्थित पत्रकार यांना घटनेची माहिती दिली, यावेळी तिन्ही घटनेतील खूनाचा घटनेतील आरोपी तात्काळ अटक केले असल्याचे सांगितले.


ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घडणाऱ्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी दर आठवडयात ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भेट देऊन विविध गुन्हयातील आरोपी व इतर माहिती घेणार असल्याचे सांगितले असुन कारावास भोगुंन जे गुन्हेगार परत येत असुन पुर्व दुश्मनी यासह वेगवेगळ्या कारणाने होत असलेल्या भांडणातून खुन, मारामारी, यासह विविध कारणांमुळे होत असलेल्या सार्वजनिक ठिकाणी भांडणे यासाठी गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कार्यवाही किंवा तडीपार ही कार्यवाही करुन या वर अकुंश ठेवणार असुन या साठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी संख्या बळ कमी व हद जास्त असल्याने आहे त्या कर्मचारी यांच्या वर जास्त कामाचा ताण येत असल्याने संख्याबळ वाढवून देण्याची व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक लातुर फाटा ते रमाई चौक सिडको जड वाहनधारकांना बंद करावा, शाळा, महाविद्यालय, व बायपास रोडवर व होणारे टारगट मुलाकडून छेडछाड प्रकरणात वाढ, व वाहतूक शाखेच्या वतीने सिडको परिसरात वाहतूक कर्मचारी या बाबत लक्ष केंद्रित केले.

तात्काळ जिल्हा पोलीस मुख्यालयातून दहा बाईक व दहा कर्मचारी गस्तीसाठी तर पोलीस मुख्यालयातून एक वाहन चौविस तास गस्तीसाठी व शहर वाहतूक शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हडको व सिडको छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रमाई चौक या ठिकाणी वाहतूक शाखेच्ये कर्मचारी नेमणूक करून वाहतूक सुरळीत करणार असल्याचे सांगितले, ग्रामीण हद्दीत असलेल्या अनेक गुन्हेगारावर तडीपार करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगून पोलीस प्रशासनास वेळी वेळी सहकार्य करण्याचे ही सांगितले,तर हद्दीत मोठया प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस स्टेशन विभाजन करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेशीत केले आहे. यावेळी ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्यी उपस्थिती होती.


