Superintendent of Police Shri Krishna Kokate | वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे विशेष लक्ष देणार – जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे -NNL
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सलग तिन दिवस झालेल्या खूनाचा घटनेनंतर परिसरात व शहरात खळबळ उडाली, या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट देऊन तिन्ही घटनेचा आढावा घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालय येथुन पाठवुन व शहर वाहतूक शाखा मार्फत विविध भागात रस्ता सुरळीत होण्यासाठी व गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
ग्रामीण पोलीस स्टेशन येथे १८ जुलै रोजी सतत तिन दिवस झालेल्या खूनाचा गुन्हा संदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, यांनी भेट घेऊन तिन्ही गुन्हयातील माहिती घेऊन घटनेचा आढावा घेतला व उपस्थित पत्रकार यांना घटनेची माहिती दिली, यावेळी तिन्ही घटनेतील खूनाचा घटनेतील आरोपी तात्काळ अटक केले असल्याचे सांगितले.
...
