कृषीनांदेडव्हिडीओ

Incidence of red rot : पावसामुळे नुकसान : लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला, शेतकरी चिंतेत

हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यात मागील काळात झालेल्या सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहिले असून, चिबाड जमिनीत पाणी न सुकल्याने कापूस पिकावर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर फवारण्या करूनही काहीच फरक पडत नाहीये, उलट कापसाची वाढ खुटली असून, पाने लालसर होत असल्याने लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

या रोगामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. विशेषतः कमी क्षेत्रात शेती करणाऱ्या आणि नैसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक भयावह ठरत आहे.

अतिशय चिंतेची बाब म्हणजे, कृषी विभागाकडून स्थानिक स्तरावर कोणतेही योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पिकांना वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारची कीडनाशके, बुरशीनाशके अथवा योग्य प्रक्रिया करावी, याबाबत अंधारात ठेवले जात असल्याने शेतकरी अन्नभिन्न झाले आहेत. त्यामुळं रान शिवारात असलेल्या काळजीवाहू वास्तवदर्शी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

शेतकऱ्यांची मागणी
शेतकऱ्यांनी कृषी विभागाने त्वरित क्षेत्रभेट घेऊन योग्य त्या उपाययोजना व मार्गदर्शन द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच, लागण झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणीही जोर धरत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button