Monday, June 29

Tag: Farmers are worried

Incidence of red rot : पावसामुळे नुकसान : लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला, शेतकरी चिंतेत

Incidence of red rot : पावसामुळे नुकसान : लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला, शेतकरी चिंतेत

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यात मागील काळात झालेल्या सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहिले असून, चिबाड जमिनीत पाणी न सुकल्याने कापूस पिकावर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर फवारण्या करूनही काहीच फरक पडत नाहीये, उलट कापसाची वाढ खुटली असून, पाने लालसर होत असल्याने लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या रोगामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. विशेषतः कमी क्षेत्रात शेती करणाऱ्या आणि नैसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक भयावह ठरत आहे. अतिशय चिंतेची बाब म्हणजे, कृषी विभागाकडून स्थानिक स्तरावर कोणतेही योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पिकांना वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारची कीडनाशके, बुरशीनाशके अथवा योग्य...
yellow mosaic : कोवळ्या सोयाबीनवर यल्लो मोझॅक आणि वाढू लागलेल्या ताणामुळे शेतकरी हैराण

yellow mosaic : कोवळ्या सोयाबीनवर यल्लो मोझॅक आणि वाढू लागलेल्या ताणामुळे शेतकरी हैराण

कृषी, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या पाच-सहा दिवसात झालेल्या सततच्या पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रभाव होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. या अगोदर गोगलगायी आता येलो मोझॅक, किडींचा प्रादुर्भाव आणि सोयाबीनच्या पिकाबरोबर वाढू लागलेल तण यंदाचा खरीप हंगाम नुकसानदायक ठरतो की काय..? अशी चिंता शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे. हिमायतनगर तालुक्यात शेतकऱ्यांनी जून महिन्यात सोयाबीनची पेरणी केली. यास जवळपास महिना होत आला असून,अधून मधून झालेल्या पावसाने सोयाबीनची पिके वाऱ्यावर डोलू लागले आहे. सुरुवातीला सोयाबीनवर गोगलगायने आक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता. बहुतांश सोयाबीनच्या पिकांना कुरतडून काढले त्यानंतर अळीचा प्रादुर्भाव झाला. दरम्यान दडी मारलेल्या वरून राजाने पावसाला सुरुवात केली. पाच ते सहा दिवस झालेल्...
error: Content is protected !!