कृषीनांदेड

Urea fertilizer : युरिया खत वितरणाबाबत इफ्फको कंपनी प्रतिनिधिला जिल्हाधिकारी यांची नोटिस

नांदेड| नांदेड जिल्ह्यात इफ्फको कंपनीमार्फत 6 जून 2025 रोजी युरिया खताची रॅक वितरित करण्यात आली. यापूर्वी, इफ्फको कंपनीचे जिल्हा प्रतिनिधि सचिन घाडगे यांनी 1405 मे. टन पुरवठ्याचे नियोजन कृषी अधिकारी जिल्‍हा परिषद यांच्‍या मेल आयडीवर सादर केले होते. या पुरवठा नियोजना बदल सुचवताना कृषि विकास अधिकारी यांनी तालुकानिहाय पुरवठा नियंत्रित करण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. विशेषत: बिलोली तालुक्याला किमान 40 मे. टन युरिया खत पुरवठा करण्याचे सुचवले होते.

दिनांक 9 जून 2025 रोजी इफ्फको कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सचिन घाडगे यांनी युरिया रॅकच्या अंतिम पुरवठा नियोजनाची माहिती कृषि विकास अधिकारी यांना सादर केली. त्यावेळी हे लक्षात आले की, सादर केलेल्या पुरवठा नियोजन आणि रेल्वे रॅक (आर.आर.) यामध्ये 165 मे. टन तफावत आहे.

याप्रमाणे, इफ्फको कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधिने बिलोली तालुक्याच्या पुरवठा बाबत दिलेल्या सूचनांची अवहेलना केली आहे. बिलोली तालुक्याला निरंक युरिया खत पुरवठा केला असून, माहूर, किनवट व इतर तालुक्यात असमान वितरण केले आहे. कृषी विक्रेत्यांच्या तक्रारींच्या आधारावर, इफ्फको कंपनीने काही विक्रेत्यांना युरिया खताचा पुरवठा केला आहे, परंतु बरेच कृषी विक्रेते युरिया खतापासून वंचित राहिले आहेत.

यावरून असे स्पष्ट होते की, इफ्फको कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी यांनी जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीच्या सचिव, कृषि विकास अधिकारी यांच्या सूचनांचे पालन केले नाही. या कारणामुळे जिल्ह्यात युरिया खताचे वितरण असमतोल झाले आहे. इफ्फको कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सचिन घाडगे यांना युरिया खत वितरणात अनियमितता, तसेच खत नियंत्रण आदेश 1985 तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे उल्लंघन झाल्यामुळे कारवाई का करुनये याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 24 तासांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. खुलासा असमाधानकारक ठरल्यास, इफ्फको कंपनी व त्यांच्या जिल्हा प्रतिनिधीवर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली जाऊ शकते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button