नांदेड। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज सोनेकर यांच्या वतीने दिव्यांग कुटुंबांना एक महिन्याचे जीवनावश्यक धान्य किट वाटप करण्यात आले.


हा उपक्रम नांदेड येथील संत गाडगेबाबा चौका जवळील साई मंदिर परिसरात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


नांदेड शहरातील अधिक विविध दिव्यांग व्यक्तींना एक महिना पुरेल इतके राशन किट वाटप करून सुरज सोनेकर यांनी सामाजिक भान जपत एक वेगळा पायंडा पाडला. या प्रसंगी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, जयस्वाल मॅडम, गोल्डन मॅन शंकपाळ, रवी लोहाळे मुखेडकर, परमेश्वर दीपके यासह आदींची उपस्थिती होती. सामाजिक एकोपा व सहकार्याचा प्रेरणादायी संदेश देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.
