Disabled people beg in a half-naked state in front of the MLA’s house in Nanded नांदेड| आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांसाठीचा 30 लक्ष रुपयाचा निधी खर्च करण्यात येत नाही. तसेच संजय गांधी निराधार लाभार्थ्यांच्या मानधनातं वाढ केली जात नाही. त्यामुळे नांदेमधील आमदारांच्या घरासमोर दिव्यांग लाभार्थ्यांनी अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन करून अधिवेशनात दिव्यांगांचे प्रश्न उपस्थित करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

दिव्यांगांच्या व संजय गांधी निराधार लाभार्थ्यांच्या मागण्या अधिवेशनात उपस्थित करण्यास चालढकल केली जात आहे. याकडे राजकीय नेते दुर्लक्ष करत असल्याने त्याच्या निषेधार्थ रविवारी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेडच्या तरोडा नाका परिसरातील आमदार हेमंत पाटील आणि मालेगाव रोड नांदेड येथील आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिस प्रशासनाकडून दोन्ही भागांमध्ये तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आमदार बालाजी कल्याणकर यांनी आंदोलनकर्ते दिव्यांगांची भेट घेऊन निवेदन स्विकारले आणि उद्यापासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात मी दिव्यांगांच्या हक्कासाठी आवाज उठविणार असल्याचे म्हणत आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतील दिव्यांगांचा निधी इतरत्र कुठेही न वळविता दरवर्षी खर्च केलं जाईल असे आश्वासन दिले. तसेच संजय गांधी निराधार लाभार्थ्यांच्या मानधन वाढिसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या आश्वासना नंतर आंदोलकांनी आपला मोर्चा आमदार हेमंत पाटील यांच्या घराकडे वळविला प्रचंड घोषणाबाजी आणि अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलनाने तरोडा नाका परीसर, मालेगाव रोड परीसर दणाणून गेले होते. या अर्धनग्न भीक मागो आंदोलनात नागरिकांनी १ रूपया, २ रूपये, ५ रूपये,१० रूपये,२० रूपये, ५० रूपये आणि १०० रूपये असे भरभरून दोन्ही आमदारांच्या नावावर भिक मागली.



आमदार हेमंत पाटील हे उपस्थित नसल्यामुळे काहि काळ संतप्त दिव्यांगांनी आक्रोश व्यक्त करत आमच्या दिव्यांगांच्या प्रचारामुळेच पहिल्यांदा आमदार व नंतर प्रचारामुळेच खासदार होऊनही आमच्या हक्काचा निधी खर्च न केल्यामुळे खडेबोल सुनावले. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहून भाग्यनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी आमदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधुन हकिकत सांगितली. यावेळी आमदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या वडिलांना आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्विकारण्यास सांगितले. तसेच प्रत्यक्ष फोन करून समस्त दिव्यांगांना आपण सकाळी साडेदहा वाजेपर्यंत आपली वाट बघीतली. उशीर होत असल्याने अधिवेशनात निघालो असल्याचे म्हणत दिलगीर व्यक्त केली.

यावेळी दिव्यांगांनी आमच्या समस्या अधिवेशनात मांडण्याची विनंती केली अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठल्याच सत्ताधारी पक्षांच्या सभा होऊ देणार नसल्याची ठाम भूमिका मांडली. आमदार हेमंत पाटील यांनी सुद्धा आंदोलनकर्ते दिव्यांगांना आश्वासन दिले की, अधिवेशनात मी आपल्या मागण्या संदर्भात आवाज उठविणार असल्याचे आश्वासन दिले. आणि चहा फराळ अल्पआहार करूनच जावा अशी विनंती केली. आंदोलकांनी विनंतीला मान दिला आणि अशा प्रकारे आजचा दुसरा टप्पा पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सकल दिव्यांग संघटनेचा पार पडला.
या आंदोलनात दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील, व्यंकट कदम, सुनिल जाधव, शिवराज बंगरवार, संभाजी सोनाळे, शिवाजी सुर्यवंशी, पिंटुभाऊ राजेगोरे, प्रेमकुमार वैद्य,रवि कोकरे,प्रदिप हणवते, मिलिंद सितळे, शेख खालेद, माधव हिवराळे, सय्यद आतिक, बालाजी इप्तेवार आरळीकर, शेख गौस, कार्तिक कुमार भरतिपुरम, सय्यद आरिफ, किरणकुमार न्यालापल्ली, नारायण तांडलवार, शेख माजीद, बालाजी ढगे, मिटकर,सईद वैद्य मौलाना, शेख सादिक, शेख मतीन, भोजराज शिंदे, सुनिल कांबळे, शेख सुफियान, सिद्धोधन गजभारे, प्रशांत हणमंते, राजु इराबत्तीन, शेख आलीम, बालाजी ढगे, नवघडे, मिटकरे, भाग्यश्री नागेश्वर, अफरोजा खानम,कल्पना सकते, शेख जैनाज,लोणेबाई व मुकबधीर कर्णबधिर दिव्यांगांसह हजारो सकल दिव्यांग सहभागी झाले होते.
