Citizens have to drink contaminated water due to the negligence of the Municipal Corporation; Fear of contracting epidemic diseases नांदेड| शहरातील भोई गल्ली व सिद्धनाथपुरी येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती भर पावसाळ्यात भटकंती होत असून, महानगरपालिकेचे आयुक्त टंचाईग्रस्त भागाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांना नळाद्वारे कधीतरी पाणी पुरवठा केला जात आहे. केला तरी ते पाणी सुद्धा दूषित, दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिकांना साथीचा आजाराचा सामान करण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


पावसाळा आला तरी नांदेड वाघाळा महानगर पालिका हद्दीतील भोई गल्ली व सिद्धनाथपुरी येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. महानगरपालिकेचे आयुक्त हे उंटार बसून शेळ्या हाकत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नळाद्वारे येणार पाणीपुरवठा तो हि दोन दिवसा आड येत असून, तेस सुद्धा दूषित, दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिक महिला व लहान बालकाचे आरोग्य धोक्यात आले आहे.


शासन एकीकडे स्वच्छ पाणी देण्यासाठी करोडो रुपये खर्च करत आहे. तसेच जनतेच्या आरोग्यासाठी देखील मोठ्या योजना राबवित आहे. मात्र मात्र नांदेड महानगरपालिकेचे अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून ठेकेदार व लोकप्रतिनिधीला हाताशी धरून बोगस बिले काढून नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा करत आहेत. नांदेड मधील नागरिकांना शुध्द पाण्याच्या नावाखाली दूषित पाणी पुरवठा करत असल्याचा आरोप महिला व पुरुष नागरिकरून केला जात आहे.

याविषयी भोई गल्ली व सिद्धनाथपुरी येथील नागरिकांनी पाणी द्या… नाहीतर राजीनामा द्या… अशा प्रकारचं पत्र आयुक्तला लिहिल आहे. मात्र या पत्राकडे आयुक्त महोदयांनी अक्षम्य दुर्लक्ष करून केराची टोपली दाखवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दूषित पाण्याच्या प्रकाराला वैतागलेल्या नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या हाद्दितिल नागरिकांत संतापची लाट उसळी आहे. याकडे नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी लक्ष देऊन भोई गल्ली व सिद्धनाथपुरी मध्ये नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याकडे लोकधा द्यावे अशी मागणी केली जात आहे. जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतील..? याकडे दूषित पाण्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.
