श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूर गडावर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून लाखो भाविकांचा मोठा ओघ येत आहे. भाविकांच्या या गर्दीत कोणालाही उपाशी जावे लागू नये, यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर येथे भोसीकर आणि एकलारे परिवारासह स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून येणाऱ्या लाखो भाविकासाठी अन्नदान सेवा सुरू करण्यात आली आहे.


मंडळाच्या विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली अखंड नऊ दिवस अन्नदान सेवा सुरू असून भाविकांना प्रसादाचा लाभ मिळणार आहे. भाविकांसाठी रुचकर व पौष्टिक प्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, दरवर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.


मागील पाच वर्षांपासून अन्नछत्र मंडळाची सेवा अविरतपणे सुरू आहे. सामान्य दिवसांमध्ये दररोज सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत महाप्रसादाचा लाभ घेता येतो, तर यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी सकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत अखंड महाप्रसाद सुरू ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दिवसभर येणाऱ्या यात्रेकरूंना प्रसादाची कोणतीही गैरसोय होत नाही.


या सेवेत मंडळाचे विश्वस्त, सेवेकरी व स्वयंसेवक यांचा निस्वार्थ सहभाग कौतुकास्पद ठरत असून, त्यांच्या परिश्रमामुळे माहूर नगरीचा नावलौकिक देशभरात वाढीस लागला आहे. “प्रत्येक भाविकाला पोटभर प्रसाद मिळावा” या भावनेतून अखंडितपणे सुरु असलेली ही सेवा माहूर नगरीच्या आध्यात्मिक परंपरेला अधिक बळकट करणारी ठरते.माहूर नगरीत दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी या पवित्र सेवेत सहभागी व्हावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी येथे श्री रेणुका मातेची आरती करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मनोहर भोसीकर रामराव एकलारे संजय भाऊ मारवाडे यांचेसह अध्यक्ष विजय गवारे उपाध्यक्ष राजकुमार भोपी सचिव महेश भिंगेवार कोषाध्यक्ष सुदेश मुक्कावार सदस्य विनोद भाऊ राठोड सदस्य शंकरराव कोतेवार सदस्य दिलीप गुंडावार राजकुमार वाघमारे पुंडलिकराव टनमने दतराव बोमिनवार मॅनेजर किरण तुप्तेवार राजेश गिरी यांचे सह मंडळाचे सर्व सदस्य मान्यवर भावी उपस्थित होते.



