Swami Samarth : स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ कडून लाखो भाविकांसाठी महाप्रसादाची सोय
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूर गडावर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून लाखो भाविकांचा मोठा ओघ येत आहे. भाविकांच्या या गर्दीत कोणालाही उपाशी जावे लागू नये, यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर येथे भोसीकर आणि एकलारे परिवारासह स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून येणाऱ्या लाखो भाविकासाठी अन्नदान सेवा सुरू करण्यात आली आहे.
मंडळाच्या विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली अखंड नऊ दिवस अन्नदान सेवा सुरू असून भाविकांना प्रसादाचा लाभ मिळणार आहे. भाविकांसाठी रुचकर व पौष्टिक प्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, दरवर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
मागील पाच वर्षांपासून अन्नछत्र मंडळाची सेवा अविरतपणे सुरू आहे. सामान्य दिवसांमध्ये दररोज सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत महाप्रसादाचा लाभ घेता येतो, तर ...
