नांदेड | ‘धर्माबाद परीसरातील शेतक-याना शेतामालास जास्त भाव देण्याचे आमीष दाखवुन शेती माल विश्वासाने खरेदी करून फसवणुक (Dharmabad police arrested five people for cheating by purchasing agricultural products at high prices) करणारे आरोपी लक्ष्मण कोडीया देवकर, सायन्ना गंगाराम ईप्तेकर पोतन्ना सायन्ना ईप्तेकर, बालाजी सायन्ना ईप्तेकर, संजय गंगाधर देवकर सर्व रा.समराळा ता. धर्माबाद जि. नांदेड या पाच जणांना धर्माबाद पोलीसांनी अटक केली असून, आत्तापर्यंत 35 हुन अधिक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.


याबाबत सविस्तर असे कि, सन २०२२ ते सन २०२४ पावेतो यातील आरोपीतानी संगनमत करुन फिर्यादीस व धर्माचाद परीसरातील शेतक-यांना शेतीचे मालाला ईतर व्यापा-यापेक्षा जास्त भाव देतो असे सांगीतल्याने आरोपीवर विश्वास ठेवून फिर्यादी व त्याचे सोबत ईतर शेतक-यानी त्याचे शेतात उत्पन्न झालेले सोयाबिन, तूर, हरभरा असे एकुण जवळपास २६६४ क्वीटल माल एकुम किंमती २,२७, २८,५७७ रुपयाचा शेतीमाल सन २०२२ ते डिसेंबर २०२४ पर्यत आरोपी लक्ष्मण कोंडीचा देवकर याचे श्रीकृष्ण भुसार दुकान धर्माबाद येथे विक्री केला त्याची रक्कम मागण्यास शेतकरी गेले असता ती देण्यास नकार देवुन शेतक-याचा विश्वासघात करुन त्यांची फसवणुक केली.


फसवणूक करणाऱ्या (१) लक्ष्मण कोडीया देवकर (२) सायन्ना गंगाराम ईप्तेकर (३) पोतन्ना सायन्ना ईप्तेकर (४) बालाजी सायन्ना ईप्तेकर (५) संजय गंगाधर देवकर सर्व रा.समराळा ता. धर्माबाद जि. नांदेड या ०५ आरोपीतां विरुध्द गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधव लोणेकर धर्माबाद यांचेकडे देण्यात आला आहे.


गुन्हा दाखल होताच तांत्रीक विश्लेषनाचे सहाय्याने गुन्हयातील दोन आरोपींना अटक करुन त्यांचा गुन्हयात कश्या प्रकारचा सहभाग आहे हे कोर्टास दाखवुन त्यांचा चार दिवस पोलीस कोठडी रिमांड घेतला. दि.०८/०७/२०२५ रोजी पहाटे गुन्हयातील मुख्य आरोपी लक्ष्मण कोडीचा देवकर रा.समराळा ता. धर्माबाद यास अटक करण्यात आली आहे. फसवणुक झालेले शेतकरी यांची संख्या वाढत असुन, आणखी ३५ शेतक-यांनी नमुद आरोपीविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. सदर कार्यवाही करणारे अधिकारी व अंमलदार यांचे अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी कौतुक केले.

या कार्यवाही नंतर धर्माबाद पोलीसांनी आवाहन केलं की, आणखी कोणाची अश्या प्रकारे फसवणुक झाली असेल तर त्यांनी धर्माबाद पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा, तसेच धान्य विक्री करताना खरेदीदाराची पार्श्वभुमी तपासावी, लेखी व बैंकेद्वारे व्यवहार करावा. प्रत्येकाची पावती, रशीद जपुन ठेवावी अधिकृत रशीद द्यावी.


