क्राईमनांदेड

Dharmabad Police action : धर्माबाद पोलिसांची कारवाई: दोन आरोपींकडून तीन तलवारी व दोन खंजऱ्यांची जप्ती

धर्माबाद/नांदेड | स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने धर्माबाद पोलिसांनी एक मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन तलवारी आणि दोन खंजऱ्यांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली असून, शहरात अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेत ही शस्त्रसाठा पकडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीचा शोध घेवुन त्यांचे विरुध्द कार्यवाही करण्याबाबत पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर पो.स्टे. धर्माबाद यांना आदेश दिले होते. पोलीस स्टेशन धर्माबाद येथे नमुद गुन्हयातील फिर्यादी यांना गोपनिय माहिती मिळाली की, मीजे सिरजखोड गावात हाजीखा अय्युबखा पठाण हा त्याचे राहते घरी एक तलवार व एक खंजर बाळगून आहे. त्यावरुन सदर आरोपीचे घरी छापा मारुन एक लोखंडी तलवार व एक लोखंडी खंजर पंचासमक्ष जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच पोलीसांना माहिती मिळाली की, रियान खान कासीम खान रा. ओमकार नगर, सिडको एन.डी.३२ नांदेड ह.मु. सिरजखोड ता. धर्माबाद याचेकडे सुध्दा दोन तलवार व एक खंजर असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीवरुन धर्माबाद पोलीसांनी आरोपी रियान खान याचे सिरजखोड येथील घरी पंचासह छापा मारुन त्याचे घरातुन दोन तलवारी व एक खंजर हस्तगत करुन जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्माबाद पोलीसांनी दोन वेगवेगळ्या गुन्हयात एकुण ०३ तलवारी व ०२ खंजर जप्त केले आहेत. सदर दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोहेको. संतोष संगेचार हे करीत आहेत.

धर्माबाद पोलीसांकडुन आवाहन करण्यात येते की, कोणी इसम अश्या प्रकारचे तलवारी किंवा खंजर बाळगत असल्यास त्याबाचत धर्माबाद पोलीसांना कळवावे, कळविण्या-यांचे नाव गुप्त ठेवण्यात येइल. हि कार्यवाही करणारे अधिकारी व अंमलदार यांचे अविनाश कुमार पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button