नांदेडधार्मिक

Urs festival in Kandahar : कंधारच्या उरुसात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन: संदल मिरवणुकीत हजारो हिंदू-मुस्लिम बांधव सहभागी

कंधार (सचिन मोरे) शहरातील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या प्रसिद्ध सूफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम सय्यद सईदोद्दिन रफाई रहेमतुल्ला अलय यांच्या ७११ व्या उरुसानिमित्त मंगळवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत हजारो हिंदू-मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडविले.

हजरत हाजी सय्याह यांचा दर्गा एक जाज्ज्वल्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. उरुसानिमित दर्गाच्या दर्शनासाठी हजारो भाविक-भक्त कंधारला हजेरी लावतात. जिल्हाधिकाऱ्यांकडून सुटी जाहीर करण्यात येत असल्याने उरुसाला भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. महाराष्ट्रासह शेजारील आंध्र, कर्नाटक, तेलंगणातही हाजी सय्याह यांना मानणारा वर्ग असल्यामुळे तेथील भाविक भक्तही उरुसाला दर्गामध्ये येऊन श्रद्धासुमने वाहतात.

मंगळवारी सायंकाळी पाचला फातेहाखाणीनंतर सज्जादा नशीन सय्यद शाह मूर्तुजा मोहियोद्दिन हुसैनी व मुतवली सय्यद शाह मुजतबा मोहियोद्दिन हुसैनी यांच्या मार्गदर्शनाखाली व उरूस समितीचे अध्यक्ष जफरोद्दिन बाहोद्दिन यांच्या नेतृत्वाखाली दर्यामधून संदल मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. वाजतगाजत ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक भाविक भक्तांसह मार्गस्थ झाली.

शहरातील मुख्य मार्गावरून मार्गस्थ होत भाविक-भक्तांना दर्शन देत मिरवणूक रात्री उशिरा दर्गा येथे पोचली. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान नगराध्यक्ष शहाजी नळगे, जफरोद्दीन बाहोदिन, रामराव पवार, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय भोसीकर, प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, दिलीप धोंडगे, सचिन पाटील चिखलीकर, सुधाकर कांबळे, राम बनसोडे, केशव जाधव, मनान चौधरी , स्वप्निल लुंगारे,भास्कर नळगे,सुहास कांबळे,समीर चाऊस, जीवन लुंगारे, सतीश देवकत्ते, , हमीद सुलेमान,सय्यद अमजद, आदींनी उपस्थिती लावून दर्शन घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button