Friday, June 26

Tag: A display of national unity at the Urs festival in Kandahar

Urs festival in Kandahar : कंधारच्या उरुसात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन: संदल मिरवणुकीत हजारो हिंदू-मुस्लिम बांधव सहभागी

Urs festival in Kandahar : कंधारच्या उरुसात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन: संदल मिरवणुकीत हजारो हिंदू-मुस्लिम बांधव सहभागी

नांदेड, धार्मिक
कंधार (सचिन मोरे) शहरातील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या प्रसिद्ध सूफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम सय्यद सईदोद्दिन रफाई रहेमतुल्ला अलय यांच्या ७११ व्या उरुसानिमित्त मंगळवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत हजारो हिंदू-मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडविले. हजरत हाजी सय्याह यांचा दर्गा एक जाज्ज्वल्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. उरुसानिमित दर्गाच्या दर्शनासाठी हजारो भाविक-भक्त कंधारला हजेरी लावतात. जिल्हाधिकाऱ्यांकडून सुटी जाहीर करण्यात येत असल्याने उरुसाला भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. महाराष्ट्रासह शेजारील आंध्र, कर्नाटक, तेलंगणातही हाजी सय्याह यांना मानणारा वर्ग असल्यामुळे तेथील भाविक भक्तही उरुसाला दर्गामध्ये येऊन श्रद्धासुमने वाहतात. मंगळवारी सायंकाळी पाचला फातेहाखाणीनंतर सज्जादा नशीन सय्यद शाह मूर्तुजा मोहियोद्दिन हुसैनी व मुतवली सय...
error: Content is protected !!