हिमायतनगर| जवळगांव कामारी लिंगापुर असे नांव असलेल्या कामारवाडी ते कामारी रोड पासुन लिंगापुरकडे जाणारा रस्ता मोकळा करून शेतकऱ्यांची वहिवाटीची अडचण सोडववावी अन्यथा दिनांक 06 जानेवारी 2025 पासुन अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कामारी येथील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
आमच्या शेतजमिनी ह्या मौजे कामारी शिवारात आहेत. मात्र शेतजमिनीला जाण्या – येण्यांकरीता वहिवाटीचा व परंपरागत चालत आलेला रस्ता कामारवाडी ते कामारी रोड पासुन लिंगापुर कडे जाणारा रस्ता.. ज्या रस्त्यास जवळगांव कामारी – लिंगापुर असे नांव आहे. परंतु सदर रस्त्यावर आजुबाजुच्या दोन्ही साईडच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करुन रस्त्यावर अतिक्रमण करुन रस्ता ताब्यात घेतलेला आहे.
त्यामुळे रस्त्याने जाणे येणे कठीण झालेले आहे व याबाबत रस्त्याच्या कडेच्या शेतकऱ्यांना कांही म्हणावयास गेल्यास ते उलट सुलट बोलुन वाद उभा करीत आहेत. रेकॉर्डला रस्ता नाही जेथुन रेकॉर्डला रस्ता आहे तेथुन रस्ता काढा असे म्हणल आहेत. म्हणून तहसीलदार साहेबानी सदर रस्त्याची पाहणी व चौकशी करुन अतिक्रमीत केलेला वरील रस्ता हा त्वरीत मोकळा करुन देण्यांत यावा. जर आपण त्वरीत रस्ता मोकळा करुन न दिल्यास शेतकरी दिनांक 06.01.2025 पासून अमरण उपोषणास बसणार आहोत याची नोंद घ्यावी असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर उपोषण कर्ते म्हणून प्रमोद साहेबराव शिरफुले, केशव बहिरोबा शिरफुले, परसराम श्रीरंगराव शिरफुले, ज्ञानेश्वर विठ्ठलराव शिरफुले, समाधान विश्वनाथराव शिरफुले सर्व रा. कामारी ला. हिमायतनगर जि. नांदेड यांची नावे असून, याच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड, खा. नागेश पाटिल आष्टीकर, आ. बाबुराव कदम कोहळीकर, उपविभागीय अधिकारी, हदगांव यांना पाठवल्या आहेत. यावर अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.