देगलूर, गंगाधर मठवाले। देगलूर-धर्माबाद तालुक्यातील प्रवाशांच्या मागील अनेक काळापासूनच्या मागणीला अखेर यश आले असून देगलूर-धर्माबाद या एसटी बससेवेचा दि.२७ मे रोजी शुभारंभ करण्यात आला.


देगलूर- नरसी-बिलोली- धर्माबाद या मार्गावर अनेक बसगाड्या ये-जा करतात. परंतु हे अंतर खूप अधिक आहे. मध्यंतरी देगलूर मार्गे बिलोली- धर्माबाद अशी गाडी सुरू होती;परंतु बसगाड्यांची दुरावस्था, कर्मचाऱ्यांची वाणवा, यंत्रसामग्रीचा अभाव आदी अनेक समस्यांमुळे ही सेवा कोलमडली. देगलूर तालुक्यातील चैनपुर,अंतापुर, नरंगल, तमलूर, शेवाळा आदी भागातील असंख्य प्रवाशांच्या विनंतीवरून देगलूर आगाराने अखेर देगलूर-धर्माबाद ही बससेवा दि.२७ मे पासून सुरुवात केली.


देेेगलूरहून धर्माबादच्या प्रवासासाठी निघालेली ही बस अंतापूर-चैनपूर- नरंगल- तमलूर- शेवाळा- सगरोळी- कार्ला फाटा- बिलोली- कुंडलवाडी मार्ग धर्माबाद जाणार आहे.देगलूर येथून धर्माबादला दिवसातून तीन वेळा बस गाडी जाणार आहे.देगलूर बसस्थानकातून सकाळी ८ वाजता,दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ६.३० वाजता धर्माबादला बस जाणार आहे.


तर धर्माबाद बसआगारातून देगलूरला येण्यासाठी सकाळी ५.४५ वाजता १०.१५ वाजता तर दुपारी ३.३० वाजता एसटी बस मार्गस्थ होणार आहे. देगलूरहून अगदी जवळच्या मार्गे धर्माबादला बसगाडी सुरू झाल्यामुळे पूर्ण तिकीट काढून जाणाऱ्या प्रवाशांच्या पैशाची बचत होणार असून या भागातील सर्व प्रवाशांना प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.



