ST bus service ; देगलूर-धर्माबाद एसटी बससेवेला प्रारंभ
देगलूर, गंगाधर मठवाले। देगलूर-धर्माबाद तालुक्यातील प्रवाशांच्या मागील अनेक काळापासूनच्या मागणीला अखेर यश आले असून देगलूर-धर्माबाद या एसटी बससेवेचा दि.२७ मे रोजी शुभारंभ करण्यात आला.
देगलूर- नरसी-बिलोली- धर्माबाद या मार्गावर अनेक बसगाड्या ये-जा करतात. परंतु हे अंतर खूप अधिक आहे. मध्यंतरी देगलूर मार्गे बिलोली- धर्माबाद अशी गाडी सुरू होती;परंतु बसगाड्यांची दुरावस्था, कर्मचाऱ्यांची वाणवा, यंत्रसामग्रीचा अभाव आदी अनेक समस्यांमुळे ही सेवा कोलमडली. देगलूर तालुक्यातील चैनपुर,अंतापुर, नरंगल, तमलूर, शेवाळा आदी भागातील असंख्य प्रवाशांच्या विनंतीवरून देगलूर आगाराने अखेर देगलूर-धर्माबाद ही बससेवा दि.२७ मे पासून सुरुवात केली.
देेेगलूरहून धर्माबादच्या प्रवासासाठी निघालेली ही बस अंतापूर-चैनपूर- नरंगल- तमलूर- शेवाळा- सगरोळी- कार्ला फाटा- बिलोली- कुंडलवाडी मार्ग धर्माबाद जाणार आहे.देगलूर येथून धर्माबा...
