नांदेड | दि 18 ऑगस्ट रोजी हृदय रोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या हेतूने दत्तकृपा हार्ट केअर व EECP, सेंटर डॉक्टर लेन येथे 3D Vasulography ( Cartography ) तपासणी मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आली.
यामध्ये एकूण 12 रुगणांची कारटोग्राफी तपासणी सवलतीच्या दरात करण्यात आली. यामध्ये EECP, चिलेशन उपचार पूर्ण केलेल्या रुग्णांची सुद्धा कारटोग्राफी तपासणी केली असता त्यांच्या हृदयाचा रक्तपुरवठा पूर्वी पेक्षा जास्त होत असल्याचे निदर्शनास आले. तसेंच अनेक तरुणांनी कारटोग्राफी तपासणी करून आपल्या हृदयाचा रक्त पुरवठा जाणून घेतला.
ज्यांना तपासणीमध्ये ब्लॉकेज आढळून आले त्यांना EECP, चिलेशन या विना ऑपेरेशन उपचार पद्धती बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. नांदेडमध्ये कारटोग्राफी तपासणी उपलब्ध करून हृदयविकार वेळीच ओळखून त्यावर वेळीच उपाय करून हृदय रोगामुळे होणारे मृत्यू टाळता येतील असा विश्वास रुग्णांकडून व्यक्त करण्यात आला. ही कारटोग्राफी तपासणी तसेच EECP व चिलेशन उपचार जे यापूर्वी फक्त पुणे, मुंबई, हैद्राबाद सारख्याच शहरांत उपलब्ध होती तीच सुविधा नांदेड मध्ये उपलब्ध करून दिल्या बद्दल सर्व रुग्णांनी दत्तकृपा हॉस्पिटलचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले..