हदगांव, शेख चांदपाशा| गेल्या तीन महिन्यांपासून हदगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, या बाबत शिवसेना शहर प्रमुख (शिदे गट) बबन माळोदे यांनी नांदेड परिक्षेत्रचे पोलिस उपमहानिरीक्षक यांना निवेदन देत गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, हदगाव शहर व परिसरात दिवसा गंभीर गुन्हे घडत त्यात प्रामुख्याने घरफोड्या, महिलांच्या गळ्यातील दागिने ओढणे, वाहनांची चोरी, शेतातील वीज पंप चोरी, विद्युत तारांची चोरी यांसारख्या घटना वाढल्या आहेत. तसेच शहरातील चौकाचौकात मटका जुगार, बाहेरील राज्यातून येणारा गुटखा जुगार व्यवसाय, यामुळे गुन्हेगारी वाढीस लागली आहे. पोलीस व नागरिक यांचा समन्वय दिसत नाही.


अस निवेदन कर्त्याचे म्हणने आहे, वारंवार चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करून शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


हादगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 56 गाव येत असून गेल्या तीन वर्षात आत पर्यत पाच पोलीस निरीक्षक बदलून गेले आहे यामुळे पोलिसांचा गुन्हेगारावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक (नांदेड ) गंभीर त्यांनी नोंद घेतील अशी अपेक्षा नागरिका कडून व्यक्त करण्यात येत आहे.



