नांदेड| महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांना “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाची” सप्रेम भेट म्हणून विधान सभेतल ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा देण्याबाबतचे अशासकीय विधेयक पारित करून जागतिक विक्रम घडवावा अशी मागणी डाॅ.हंसराज वैद्य यांनी केली आहे.


मंगळवार दि.15 जुलै 2025 रोजी परभणी शिवसेना आमदार मा.डाॅ.राहूल पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनांने मानधनासह सेवा सुविधा देण्या बाबत विधेयक 2025 मांडलेले बहूसंख्य आमदारांनी विधानसभेत मान्य केलेले आहे. पण महाराष्ट्र शासनाने ते अजून मान्य केलेले नाही.


या आधी सुद्धा नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटलांनी विधान सभेत हाच ज्येष्ठांच्या मानधना सह ईतरही मागण्यांचा प्रश्न अतिशय उत्तम तर्हेने मांडला होता. शासनांच्या वतिने मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाबाबतीत कसलिच हलचाल केलेली दिसत नाही.ज्येष्ठ नागरिकांचा हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे.ते आजूनही दूर्लक्षित तथा उपेक्षितच आहेत.


तेव्हा शासनास नम्र विनंती आहे की 1 आक्टोबर या “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे”औचित्त साधून त्याना ज्येष्ठ नागरिक दिनाची सप्रेम भेट म्हणून शक्य त्या योजनेतून, शक्य तेवढे मानधन व इतर मागण्यांचाही सहानुभूतिने विचार करावा. विधेक मान्य करावे, पारित करावे व जागतिक ईतिहास घडवावा आणि ज्येष्ठ नागरिकांनां सुखद धक्का ध्यावा त्यांची प्रतारणा थांबवावी.



