नांदेडलाइफस्टाइल

Diwali ; नावा मनपाच्या स्वच्छता विभागाने दिपावली निमित्ताने केली रात्रीतून साफसफाई – NNL

नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने विविध व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीपूजन निमित्ताने दुकानाचा बाहेर केळीच्ये खांबे, फुले,ऊस अन्य साहित्य लावून केलेली सजावट व‌ नंतर काढून टाकलेले साहित्य ,फटाक्यांच्या आतिषबाजी मुळे झालेला रस्त्यावर केरकचरा रात्री 12ते सकाळी 6 पर्यंत विशेष अभियान अंतर्गत केलेल्या साफसफाई मुळे व‌ मनपा अंतर्गत सहाही झोन मध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जवळपास दोनशे सतरा टन‌ कचरा संकलन करून स्वच्छ नांदेड शहर केले.

दिवाळी निमित्ताने 2 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पुजन‌ निमित्ताने शहरातील व‌मनपाचा सहा झोन अंतर्गत आयुक्त डॉ .महेश कुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक ,विभाग प्रमुख वसीम तडवी यांच्या आदेशानुसार विस स्वच्छता निरीक्षक, आर.बी.आय कंपनी सुपरवायझर यांच्या समवेत रात्री 12ते सकाळी 6 पर्यंत आर.सी. कॉमप्रेसर 23 वाहनाव्दारे,13टेम्पो,3 ट्रॅक्टर यांच्या सहाय्याने10 घंटागाडी यांच्या सहाय्याने सफाई कामगार पुरुष यांनी जवळपास 217 टन‌ कचरा संकलन केला , यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वच्छ शहर व सुंदर शहर सकाळी दिसून आले. मनपाच्या स्वच्छता विभागाने राबविलेल्या या विशेष अभियानाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button