नांदेडराजकीय

Namdar Hemant Patil : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी – नामदार हेमंत पाटील

नांदेड| मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यतः मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वादळी वारे व अतिवृष्टीमुळे केळी सह फळबाग व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना मुख्यानेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नामदार हेमंत पाटील यांनी केली.

नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह मोठया प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे,पशूंचे नुकसान झाले आहे .यामध्ये प्रामुख्याने केळी बागा जमीनदोस्त झाल्याने  केळीच्या दरात  घसरण झाली असून ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.तसेच नदी नालयांना पूर येऊन शेतकऱ्यांच्या पशुधनाची हानी झाली आहे.

त्यामुळेअतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी नामदार हेमंत पाटील यांच्यासह आमदार कोहळीकर व आमदार  बोंढारकर यांनी उपमुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ संबंधित विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांच्या समवेत हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर,आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव बोंढारकर यांची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!