देगलूर,गंगाधर मठवाले | तालुक्यातील मौ कुरुडगी ते नरगल रस्ता वरील पुल सततच्या पावसामुळे वाहून गेल्याने जनतेला विद्यार्थी ना शाळेचा संपर्क तुटला. यावर्षी पावसाळ्याचे प्रमाण तया मानाने काही नसून पावसाळा अर्ध्या च्या वर होवून देखील कुठल्याही डबक्यात नदीत तलावात पाणी साचलेले नसून केवळ बनावट पुलाचे काम केल्याने त्याचा फटका जनतेला बसतो तोच प्रत्येय आज जनतेला अनुभवास आला.


कृषी चे काही अधिकारी कामानिमित्त कुरुडगी येथे आले असता त्याची दुचाकी त्याच पुलात टायर घसरुन गेले तेव्हा गावकऱ्यांनी दुचाकी ला बाहेर काढले याची माहिती आमदार जितेश अतापुरकर समजताच संपर्क तुटला ठिकाणी येऊन पाहणी केली.



यावेळी नायब तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग चे अधिकारी पोलीस निरीक्षक मारोती मुढे बीट जमादार यांनी पहाणी करून शेतकर्यांना व गावकऱ्यांनी सध्या पुलावरून जाऊ नका असे आवाहन केले आहे




